शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

पीक कर्जाचे वाटप बारा टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:25 AM

जिल्ह्यातील केवळ १६ हजार ६०६ (१२ टक्के) शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले असले तरी, पावसाळा तोंडावर आला असताना २२ मे पर्यंत जिल्ह्यातील केवळ १६ हजार ६०६ (१२ टक्के) शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.ह्यलॉकडाउनह्ण च्या पृष्ठभूमिवर कापसासह शेतमाल घरात पडून असल्याने जवळ पैसा नाही आणि कर्ज तातडीने उपलब्ध होत नसल्याच्या स्थितीत खरीप पेरणी आणि बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविणार कसा, याबाबतचे आव्हान संकटात सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले असून, गत २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पृष्ठभूमिवर दरवर्षी १ एप्रिलपासून सुरू होणारे पीक कर्जाचे वाटप यावर्षी २६ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत २२ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ १६ हजार ६०९ (१२ टक्के) शेतकºयांना १७० कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.पावसाळा सुरू होण्यास केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला असताना, उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ १२ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, उर्वरित ८८ टक्के शेतकºयांना अध्याप पीक कर्जाचे वाटप होणे बाकी आहे. कापूस खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करूनही जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या घरात कापूस पडून आहे. लॉकडाउनच्या पृष्ठभूमिवर कापसासह इतर शेतमाल घरात पडून असल्याने जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज तातडीने मिळत नसल्याच्या परिस्थितीत खरीप पिकांच्या पेरणीचा खर्च आणि बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविणार कसा, याबाबत चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना सतावत आहे.

बँकनिहाय असे आहे -पीक कर्ज वाटपाचे वास्तव!बँक शेतकरी रक्कम(कोटी) जिल्हा सहकारी बँक ११८४६ १२५.१७ ग्रामीण बँक १९८० १८.६४ राष्ट्रीयीकृत बँका २७८३ २६.८८जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २२ मेपर्यंत १६ हजार ६०९ शेतकºयांना १७० कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

-आलोक तारेनिया व्यवस्थापक , जिल्हा अग्रणी बँक.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी