शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सातशेचा टप्पा ओलांडला; आणखी ४६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ७१२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:02 IST

गुरुवार,४ जून रोजी आणखी ४६ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१३ झाली आहे.

ठळक मुद्देव्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी १४५ अहवाल प्राप्त झाले.४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९ अहवाल निगेटिव्ह आहेत.आज प्राप्त अहवालात १९ महिला व २७ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोना संसगार्चा विळखा आणखीनच घट्ट होत असून, गुरुवार,४ जून रोजी आणखी ४६ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१२ झाली आहे. यापैकी ४८८ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत  १९० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली.अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदभार्तील हॉटस्पॉट ठरला आहे. बुधवार, ३ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६६७ होती. यामध्ये गुरुवारी आणखी ४६ रुग्णांची भर पडून हा आकडा ७१२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी १९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित 147 अहवाल निगेटिव्ह आहेत.आज सकाळी प्राप्त अहवालात १९ महिला व २७ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये ११ जण खदान येथील, सिटी कोतवाली भागातील नऊ जण, अकोट फैल येथील पाच जण, तारफैल येथील चार जण, न्यू तापडीया नगर येथील दोन, लकडगंज माळीपुरा येथील दोन जण, तर जठारपेठ, इराणीवस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी, श्रेयानगर खडकी, गुलशन कॉलनी, जीएमसी क्वार्टर, वाडेगाव बाळापूर, देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट, दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक, मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

१० जणांना डिस्चार्ज

दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तीन जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुष आहेत. हे रुग्ण  महसूल कॉलनी येथील तीन,  रामदास पेठ येथील दोन,  न्यु राधाकिसन प्लॉट येथील दोन , तर  तोष्णीवाल ले आऊट,  कौलखेड,  आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे,अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंत ४८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश जण घरी गेले आहेत. तर काही जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आता १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-७१२मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४८८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १९०

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या