दापुरा येथे कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST2021-01-25T04:19:35+5:302021-01-25T04:19:35+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा येथे नारायण बहुउद्देशीय संस्था, खापरवाडातर्फे २१ जानेवारी रोजी कोरोना योद्धांचा सन्मान ...

Corona warriors felicitated at Dapura | दापुरा येथे कोरोना योद्धांचा सत्कार

दापुरा येथे कोरोना योद्धांचा सत्कार

मूर्तिजापूर : तालुक्यातील गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा येथे नारायण बहुउद्देशीय संस्था, खापरवाडातर्फे २१ जानेवारी रोजी कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रारंभी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नारायण बहुउद्देशीय संस्थेतर्फे मूर्तिजापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन व पत्रकार, सर्पमित्र व समाजसेवकांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी रवी राठी, समाजसेवक संजू तायडे, पत्रकार संजय उमक, प्रा. एल. डी. सरोदे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, जय ग्याने, डॉ. स्वाती डिवरे, सरपंच शुभांगी नारायण सरोदे, प्रतिभा कुकडे, मंगला भटकर, प्रशांत दशरथी, विवेक कांबे, राहुल रोकडे, जीवन ढोकणे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण सरोदे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद गवई यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष सतीश यांनी आभार मानले. यावेळी भीमराव गव्ई, संघपाल गवई, राहुल गवई, दामोदर समाधान सावळे, ज्ञानेश्वर अनिल सावळे, शरद पूर्णाजी सरोदे, अरूण भागवत, आनंदा गवई, गोपाल खेडकर, राहुल गवई, साहेबराव गवई, प्रफुल गवई, सिद्धार्थ शिरोळे, भूषण मोरे, जगदीश खिराडे, ब्रह्मदेव भारसाकडे, शशिकांत सरोदे, विठ्ठल इंगोले, गजानन सरोदे, सुभाष खुळे आदी उपस्थित होते.

Web Title: Corona warriors felicitated at Dapura