शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावाच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना. कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन ...

मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावाच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना. कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी असे दोघेच वारस आहेत. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लक्ष रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपूर्द केला. या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ, तसेच त्यांचे घराचे पूर्णतः नुकसान झाले असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वस्त केले. पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण, तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येतील, असेही ना. कडू यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

.......................

पूरग्रस्त गावांनजीक नाल्यांचे खोलीकरण प्राधान्याने

अकोला : जिल्ह्यात जिथे जिथे नाल्याचे पाणी गावात शिरून पुरामुळे नुकसान झाले तेथे नाला खोलीकरण काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राधान्याने करण्यात येईल, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पानेरी येथे बाेलताना सांगितले.

...........................................

बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन

अकोला : क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावणे व दर्जेदार खेळाडू, क्रीडा संधी निर्माण करणे या उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापन केले आहे. या क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

..........................