शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे स्वच्छता अभियान की ‘अभिनय’?

By admin | Updated: November 17, 2014 01:35 IST

अकोला शहरात स्वच्छ रस्त्यावर राबविले अभियान.

अकोला: भाजपतर्फे रविवारी तोष्णीवाल लेआऊट परिसरातील स्वच्छ रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान सुरू होण्यापूर्वी सफाई कर्मचार्‍यांनी रस्त्याच्या कडेला कचरा जमा करून ठेवला होता. अभियान सुरू झाल्यानंतर जमा केलेला कचरा भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कचरा गाडीत टाकला. त्यामुळे भाजपने राबविलेले स्वच्छता अभियान होते की ह्यअभिनयह्ण, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी स्वत: रस्ते स्वच्छ करावे, अशी अपेक्षा नाही; मात्र स्वच्छतेविषयीचा संदेश देण्यासाठी असलेला हा उपक्रम अस्वच्छ परिसरामध्ये राबविला असता, तर जास्त संयुक्तिक ठरला असता, असा सूर नागरिकांमधून उमटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर भाजपतर्फे ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. रविवारी सकाळी तोष्णीवाल लेआऊट परिसरात भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दूध डेअरी ते जवाहरनगर चौक हा रस्ता सिमेंट कॉँक्रीटचा आहे. अभियान राबविण्यापूर्वी सफाई कर्मचार्‍यांनी कचरा रस्त्याच्या कडेला जमा करून ठेवला. त्यानंतर लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वच्छता अभियानात सहभागी झाले. त्यांनी रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा उचलून गाडीत भरला. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सफाई कर्मचार्‍यांनी जवाहर चौकापर्यंतच्या मार्गावर स्वच्छता केली. रस्ता अरुंद असल्याने स्वच्छता अभियानाच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाली होती.