अकोला : ख्रिश्चन कॉलनीमध्ये दुपारी घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
आलिशा विश्वास मोहोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी २ वाजताच्या सुमारास त्या आईचा डबा पोहोचून देण्यासाठी गेल्या असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील ३९ हजारांचे दागिने व ३0 हजार रुपये रोख असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}