शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू की चिकनगुणिया, नागरिक संभ्रमात?

By admin | Updated: November 13, 2014 00:35 IST

राज्यात ३३ रूग्णांचा मृत्यू.

खामगाव (बुलडाणा): डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दवाखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असून, ताप डेंग्यूमुळे की चिकनगुणियामुळे अशा संभ्रमात नागरिक सापडले आहेत. संपूर्ण राज्यात डेंग्यूसह चिकनगुणियासदृश आजाराचा प्रकोप वाढल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, अमरावती विभागात डेंग्यूचे ३५0 पेक्षा जास्त रूग्ण आढळल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.अमरावती विभागात दिवसागणिक डेंग्यू, चिकनगुणियासदृश आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक भर पडत असून, राज्यात हजारो रुग्ण या आजाराने प्रभावित झाल्याचे चित्र आहे. डेंग्यू आणि चिकनगुणीया या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आजाराच्या भीतीने नागरिकांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात साडेतीन हजाराच्यावर संशयित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३३ रुग्ण डेंग्यू या आजाराने दगावले आहेत. डेंग्यू, चिकनगुणीया या आजाराच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. दिवसा चावणार्‍या डांसापासून चिकनगुणीया आणि डेंग्यू या आजाराची लागण होते. दोन्ही आजार व्हायरल असून, संपूर्ण सुरक्षितता राखल्यास या आजारापासून बचाव करता येतो. वेळीच दक्षता घेतल्यास हा आजार पूर्णत: बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरता कामा नये. या आजारापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी लहान मुलांना पूर्ण कपडे घालावेत, असे अवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे. *डेग्यू-२ विषाणू सक्रिय!महाराष्ट्रातील मुंबईसह विविध शहरांमध्ये डेंग्यू या आजाराचे सकारात्मक रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या विविध शहरात आढळलेल्या रुग्णांच्या रक्त नमुन्यात डेंग्यू-२ आणि डेंग्यू-४ प्रकारचे विषाणू आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.*केंद्राच्या पथकाकडून लवकरच पाहणीराज्यभर डेंग्यूचे थैमान वाढले आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक या शहरांमध्ये डेंग्यूसह विविध आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकुणच राज्यातील डेंग्यूसदृश परिस्थितीची केंद्रीय आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची एक चमू लवकरच राज्यातील विविध शहरातील डेंग्यूसदृश आजाराच्या परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.