शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अमेरिकेत राहणार्‍या बुलडाण्याच्या चिमुकलीस भगवद्गीतेचा अध्याय मुखोद्गत

By admin | Updated: April 13, 2017 18:07 IST

अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला.

विदेशात राहुनही जोपासली संस्कृती : श्लोक, स्त्रोतांचेही पाठांतरअकोला : संगणक, स्मार्ट फोनच्या काळात आजच्या तरुण पीढीला आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे. अमेरिकेत राहणार्‍या बुलडाणा जिल्हय़ातील दाम्पत्याने मात्र हा वारसा जपला असून, त्यांच्या साडेचार वर्षीय चिमुकलीस भगवतगीतेच्या अध्यायासह, श्लोक व स्त्रोत मुखोद्गत आहेत.मराठी नववर्षानिमित्त अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला. स्वरा चे उच्चार अत्यंत स्पष्ट असून, परदेशात राहूनही आपली मूळ संस्कृती जोपासण्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशय साठे यांनी सांगितले. या आधीही अडीच वर्षांची असताना स्वराने पसायदान मुखोद्गत सादर केले होते. एवढय़ा लहान वयात असणारे तिचे स्पष्ट उच्चार आणि पाठांतर खरोखर कौतुकास्पद आहे. तिचे इतरही ोक आणि स्तोत्र पाठांतर कमालीचे आहे. वारकरी घराण्याचा वारसा लाभलेली स्वरा ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा तालुक्यातील उंबरखेड या छोट्याशा गावची आहे. उंबरखेडचे आदर्श शेतकरी रंगनाथ कारभारी कायंदे यांची ती नात आहे. स्वराचे पणजोबा दगडवाडी येथील बाजीराव जायभाये यांचे आशीर्वाद स्वराला लाभल्याचे तीची आई अनुप्रिया केंद्रे-कायंदे यांनी सांगितले.स्वरास हा वारसा तिची आई अनुप्रिया केंद्रे- कायंदे ह्यांच्या कडून मिळालेला असून, त्यांचेही वयाच्या ५ व्या वर्षी भगवद्गीतेचे ३ अध्याय मुखोद्गत होते. त्याची दखल १९९१ साली दूरदर्शन तसेच अनेक वर्तमान पत्रांनी घेतली होती. विश्‍वशांती केंद्र आळंदी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती चे माजी समन्वयक स्व.अंगद भिकाजी केंद्रे हे स्वराचे आजोबा असून ते या मागचे प्रेरणास्थान आहेत. आजच्या आधुनिक युगातही आपली मूळ संस्कृती जपण्याचे प्रोत्साहन यातून सर्वांना नक्कीच मिळू शकेल, अशी भावना व्यक्त होत आहे.