‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:56 PM2019-11-27T13:56:32+5:302019-11-27T13:56:44+5:30

चिखलगाव येथे मंगळवार, २६ नोव्हेंबर कापूस खरेदीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.

CCI cotton purchasing center opened | ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू

‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाच्यावतीने अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील सम्यक कृषी उत्पादक प्रक्रिया सहकारी संस्था, चिखलगाव येथे मंगळवार, २६ नोव्हेंबर कापूस खरेदीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी सीसीआय चिखलगाव येथील प्रभारी नरेंद्र देसले, आनंद वानखडे, श्याम काळे, अंकुश ढोरे, सम्यकचे शीतल कुटे, नीलेश इंगळे, प्रवीण वानखडे, नितेश इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी आणि दादाराव भिचकुले यांच्या कापसाला प्रती क्विंटल ५,५०० रुपये भाव देण्यात आला.
सीसीआयमार्फत केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये कृषी उत्पादक प्रक्रिया सहकारी संस्था, चिखलगाव येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे. जिथे खासगी व्यापारी आधारभूत किमतीच्या अर्धी किमतही शेतकऱ्यांना देत नाही तिथे सीसीआयमार्फत कापूस खरेदी करणे हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे.
कापूस विक्रीक रिता आणताना शेतकºयांनी सात-बारा आधारकार्ड झेरॉक्स, ८ अ उतारा, बँक पासबुक, सर्व माहितीनिशी म्हणजे खाते क्रमांक, आयएफसी कोड, बँकेचे नाव व पूर्ण पत्ता असलेली झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे घेऊन यावे. कापसामध्ये ८ ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा नसावा.
यापेक्षा जास्त ओलाव्याचा कापूस खरेदी करण्यात येणार नाही, याची काळजी शेतकºयांनी घेणे गरजेचे आहे. कापूस विक्रीचे चुकारे ई पेमेंटद्वारा दिले जातील, असे सीसीआयच्या प्रभारींनी सांगितले.

Web Title: CCI cotton purchasing center opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.