शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

हवाला रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: May 13, 2014 09:35 IST

अशोकराज आंगडिया कुरिअरमधून २८ लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात

 

 

अकोला : जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्सद्वारे राज्याच्या विविध भागात हवालाच्या माध्यमातून पाठविण्यात येत असलेली सुमारे २८ लाख रुपयांची रक्कम सोमवारी दुपारी जप्त करण्यात आली. पैशांचा काळाबाजार म्हणून ओळख असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला. या कारवाईमध्ये एका व्यावसायिकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अशोकराज आंगडिया कुरिअर्सचे संचालक निमेश इंद्रवर्धन ठक्कर (४0) रा. नवरंग सोसायटी यांच्या कुरिअर्सच्या माध्यमातून हवाला रॅकेटची सुमारे २७ लाख ७९ हजार ३५0 रुपयांची रोकड सोमवारी राज्याच्या विविध भागात पाठविण्यात येत होती. या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या पथकाने जुने कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्समध्ये छापा टाकून तब्बल २७ लाख ७९ हजार ३५0 रुपयांची रोकड जप्त केली. यासोबतच ३0 हजार रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, यामध्ये नोटा मोजण्याचे यंत्र, ४ महागडे मोबाईल, नोटांची पंचिग मशीन, ६ लॅन्डलाईन फोनचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली २८ लाख रुपयांची हवालाची रक्कम क्रिकेटवरील सट्टाबाजार, कमोडिटीज आणि अनधिकृत व्यवसायाची असल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्समधून हवालाची रक्कम पाठविण्यात येणार असल्याची माहिती एका आठवड्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मागील आठवड्यापासून हे पथक आंगडिया कुरिअर्सवर पाळत ठेवून होते. सोमवारी रक्कम राज्याच्या विविध भागात पाठविण्याची तयारी सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ही रक्कम जप्त केली.

  ■ जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअरचा छापा यशस्वी होताच स्थानिक गुन्हे शाखेने बाजूलाच असलेल्या इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसमध्ये छापा मारला; मात्र त्यापूर्वीच या कुरिअर सर्व्हिसेसमधील कर्मचारी पळून गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेस कार्यालयाची झाडाझडती घेतली; मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही.
आयकर विभागाच्या परवानगीनंतर तपास
■ अशोकराज आंगडिया कुरिअर्समधून जप्त करण्यात आलेल्या २८ लाख रुपयांचा हवाला रकमेचा तपास करण्याची परवानगी आयकर विभागाकडून घेण्यात येणार आहे. आयकर विभागाच्या परवानगीनंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. १८ लाखांची रोखही आढळली
■ स्थानिक गुन्हे शाखेने जुना कॉटन मार्केटमधील कुरिअर सर्व्हिसेसमध्ये राबविलेल्या धाडसत्रात एका इन्व्हेस्टमेंटच्या कार्यालयातून १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची रोखही आढळली. अशोकराज आंगडिया कुरिअर सर्व्हिसेस आणि त्यानंतर इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसच्या छाप्यानंतर पोलिसांनी बाजूलाच असलेल्या शशीकांत इन्व्हेंस्टमेंटमध्येही तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची आणखी रोखही आढळली. ही रक्कम जप्त करून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शशीकांत इन्व्हेंस्टमेंटचे संचालक नवीन गुप्ता यांनी सदर रकमेची रीतसर देयके आणि बँकेच्या सोमवारी करण्यात आलेल्या व्यवहाराच्या पावत्या पोलिसांना दाखविल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता ही रक्कम सोमवारीच अकोला अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतून काढण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी चहूबाजूने तपासणी केल्यानंतर ही १८ लाख रुपयांची रक्कम अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुप्ता यांना ही रक्कम परत देण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 'व्हाइट कॉलर' येणार समोर
■ स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी जप्त केलेल्या हवाला रॅकेटच्या रकमेचा तपास सखोल केल्यानंतर अनेक व्हाइट कॉलरवाल्यांचे काळे धंदे समोर येणार असल्याची शक्यता पोलिस विभागाने वर्तविली आहे. हवाला रॅकेटची रक्कम पाठविण्याचा काळय़ा बाजारामध्ये शहरातील अनेक बड्या उद्योजक व व्यापार्‍यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्या चेहर्‍यावरील पडदा लवकरच उठणार असल्याची माहिती आहे.
कुरिअर सर्व्हिसेस बंद
■ अशोकराज आंगडिया कुरिअरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून रक्कम जप्त करताच इतर बहुतांश कुरिअर सर्व्हिसेची कार्यालये बंद करण्यात आली होती. हवाला रॅकेटचा गोरखधंदा करणार्‍या कुरिअर सर्व्हिसेसच्या संचालकांनी कार्यालये बंद करून त्यांनी सोमवारी दुपारी शहराबाहेर पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशोकराज आंगडियाच्या छाप्यानंतर एलसीबीने विविध कुरिअर सर्व्हिसेसच्या कार्यालयांची तपासणी केली; मात्र बहुतांश कार्यालये बंद होती.