लाचखोर गटशिक्षणाधिकारी कारागृहात

By Admin | Updated: July 12, 2014 01:55 IST2014-07-12T01:38:44+5:302014-07-12T01:55:53+5:30

लाचखोर गटशिक्षणाधिकार्‍याची रवानगी कारागृहात.

Bribery Graduate Officer Jail | लाचखोर गटशिक्षणाधिकारी कारागृहात

लाचखोर गटशिक्षणाधिकारी कारागृहात

अकोला: सर्व शिक्षा अभियानांतर्गत दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावरील खर्चाचे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा बाश्रीटाकळी पंचायत समितीमधील लाचखोर गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नथ्थुआप्पा पस्तापुरे याला एलसीबीने गुरुवारी दुपारी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
सर्व शिक्षा अभियानातील विशेष शिक्षक संजय दुर्गादास मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक उपक्रमांवर झालेल्या खर्चाचे देयक त्यांनी बाश्रीटाकळी पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नथ्थुआप्पा पस्तापुरे यांच्याकडे सादर केले; परंतु चंद्रकांत पस्तापुरे याने या अंध शिक्षकाकडे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली; परंतु मुळे यांनी स्पष्ट शब्दात पस्तापुरे याला नकार दिला; परंतु तरीही पस्तापुरे हा लाच देण्यासाठी मुळे यांच्यावर दबाब टाकीत होता. अखेर संजय मुळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

Web Title: Bribery Graduate Officer Jail