शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉटलनेक’ हटविणार

By admin | Updated: May 30, 2017 02:16 IST

गोरक्षण रोड : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील गोरक्षण रोडवरील नेहरू पार्क ते शुभम मंगल कार्यालयापर्यत रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरील अतिक्रमण महिनाभरात हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला दिले.या आदेशामुळे गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ हटविला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या संदर्भात सतत पाठपुरावा केला आहे. अकोल्यातील रस्ते विकास कामांत गोरक्षण रोड कामाच्या पहिल्या टप्प्यात नेहरू पार्क ते शुभम मंगल कार्यालयापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यानुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रीराम पटोकार उपस्थित होते. गोरक्षण रस्त्याच्या कामासाठी भागवत हॉस्पिटल ते महावितरण कार्यालयापर्यंत रस्त्यावरील पक्या अतिक्रमणामुळे बॉटलनेक तयार झाला होता. हे अतिक्रमण महिनाभरात काढून, रस्ता मोकळा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला यावेळी दिले. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.