शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कांदा बियाणे निघाले बोगस; बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:35 PM

अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील शेलू येथील प्रकाश सहदेवराव काकड, रतिराम सखाराम काकड, श्रीराम रामकृष्ण काकड, शालिनी रामदास काकड या शेतकºयांनी बार्शीटाकळी येथील माउली कृषी सेवा केंद्रातून १८/१२/२०१८ रोजी कांदा बियाणे खरेदी केले. यामध्ये प्रकाश काकड यांची शेलू येथे सातबारा नंबर ४ वर, ०.३९ आर एवढी शेती असून, संपूर्ण क्षेत्रात १९/१२/२०१८ रोजी कांदा बियाण्यांची पेरणी केली. गेल्या महिनाभराच्या काळात या शेतीत एकाही ठिकाणी बियाण्यांचे अंकुर निघाले नाहीत. त्यामुळे प्रकाश काकड यांचे सुमारे ७५ ते १०० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे किमान १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश काकड यांनी बार्शीटाकळी पंचायत समितीत दिलेल्या निवेदनातून केली असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाबीजच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, रतिराम काकड यांची १.५१ आर शेती असून, त्यांनीही हेच बियाणे लावले होते. त्यांचेही १५० ते १७५ क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच श्रीराम काकड यांची ०.५० आर शेती असून, त्यांचे १०० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. जवळपास १ लाखाचे नुकसान झाले आहे. शालिनी काकड यांची १.० आर शेती असून, त्यांचेही १२० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले. १ लाखावर त्यांचेही नुकसान झाले आहे. या सर्वांनी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये महाबीजच्या कांदा बियाण्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून, नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाबीजच्या कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीBarshitakliबार्शिटाकळी