लोहारा येथील नदी पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:51 IST2020-02-23T17:51:37+5:302020-02-23T17:51:45+5:30
या वृद्धाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयीचे गूढ कायम आहे.

लोहारा येथील नदी पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला
लोहारा (अकोला): येथील असलेल्या मन नदीच्या पात्रात ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह रविवारी आढळला. गजानन भगवान अंभोरे रा. सोनाळा ता. संग्रामपूर जि. बुलडाणा असे मृतकाचे नाव आहे. या वृद्धाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयीचे गूढ कायम आहे.
लोहारा गावाजवळील मन नदी पात्रात कवठा बॅरेजचे पाणी अडविण्यात आले आहे. लोहारा येथील पुलाजवळ २३ फेब्रुवारी रोजी सकाळी एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळला. घटनेची माहिती कळताच उरळचे ठाणेदार संजीव राऊत, बिट जमादार संजय वानखडे व जयेश शिंगारे यांनी घटनास्थळावर भेट देऊन प्रेत पाण्याच्या बाहेर काढले. पंचनामा करून पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात पाठविले. सदर प्रेताविषयी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तपासात हा मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळ या गावातील गजानन भगवान अंभोरे यांचा असल्याचे समोर आले. अंभोरे हे गत तीन दिवसांपासून घरून निघून गेले होते. सदर वृद्धाने आत्महत्या केली त्याची हत्या झाली, याविषयी उरळ पोलीस तपास करीत आहेत.