शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

महापालिकेच्या हालचालींवर सत्ताधारी भाजपचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 2:19 PM

प्रशासनाकडून मोबाइल कंपन्यांविरोधात होणाºया दैनंदिन कारवाया व हालचालींवर सत्ताधारी भाजपकडून ‘वॉच’ ठेवल्या जात आहे.

अकोला: एरव्ही मनपा प्रशासनाच्या लहान-सहान बाबींमध्ये लक्ष देऊन प्रशासनाला निर्देश देणाऱ्या सत्ताधारी भाजपने अनधिकृत फायबर आॅप्टिक केबल प्रकरणी तोंडावर बोट ठेवल्यामुळे अकोलेकरांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाºया मोबाइल कंपन्यांचे केबल जप्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक व्यवस्थापक व ‘व्हेंडर’विरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात आजपर्यंत सत्तापक्ष भाजपातील एकाही आजी-माजी पदाधिकाºयाने आयुक्त संजय कापडणीस यांना लेखी पत्र दिले नसल्याची माहिती आहे. असे असले तरी दुसरीकडे याप्रकरणी प्रशासनाच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवल्या जात असून, कारवाईची दैनंदिन माहिती घेतली जात असल्याचे बोलल्या जात आहे.महापालिका प्रशासनाची दिशाभूल आणि फसवणूक करीत मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी सुविधेच्या नावाखाली शहरात अनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनुष्यबळ विकास, दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आढावा बैठकीत मोबाइल कंपन्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. १६ जानेवारी रोजी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत मोबाइल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी शहरात अनधिकृत केबलचे जाळे टाकल्याची चूक कबूल केली होती. यासंदर्भात मनपाने दिलेल्या परवानगीचे दस्तऐवज काही कंपन्यांनी १७ जानेवारी रोजी सादर केले. सदर कागदपत्रांची बांधकाम विभागाकडून पडताळणी सुरू असून, आजवर बांधकाम विभागाच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत केबल आढळून आले आहे. अर्थात, या गंभीर प्रकरणाची दखल घेत सत्ताधारी भाजपाने तातडीने प्रशासनाला ठोस कारवाईचे निर्देश देणे अपेक्षित होते. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार होत असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मोबाइल कंपन्यांविरोधात होणाºया दैनंदिन कारवाया व हालचालींवर सत्ताधारी भाजपकडून ‘वॉच’ ठेवल्या जात आहे.केंद्रीय राज्यमंत्र्यांची करडी नजरमोबाइल कंपन्यांनी मनपाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची इत्थंभूत माहिती केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांना असल्यामुळेच त्यांनी १० जानेवारी रोजी आढावा बैठकीत कंपन्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्र्यांची करडी नजर असताना सत्ताधारी भाजपने प्रशासनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास अनेकांची राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कंत्राटदाराचे भाजपसोबत लागेबांधेशासनाच्या महानेट प्रकल्पांतर्गत फायबर आॅप्टिक केबलचे खोदकाम करून जाळे टाकणाºया स्टरलाइट टेक कंपनी आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने एकाच कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदाराचे भाजपमधील काही पदाधिकाºयांसोबत लागेबांधे असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होणार असल्याची कुणकूण लागताच सत्तापक्षाने पडद्याआडून हालचाली सुरू केल्याची चर्चा खुद्द भाजपमध्येच रंगली आहे. त्यामुळे आजवर चुप्पी साधलेले आजी-माजी पदाधिकारी कंत्राटदाराची खुलेआमपणे बाजू घेतील का, हे लवकरच दिसून येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा