शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे जोतीबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

पोळा चौकात अवैध नळजोडणी अकोला:शहराच्या विविध भागांत अवैधरित्या नळजोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळजाेडणी ...

पोळा चौकात अवैध नळजोडणी

अकोला:शहराच्या विविध भागांत अवैधरित्या नळजोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळजाेडणी घेऊन त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परमिट नसलेल्या ऑटाेमुळे वाहतुकीची कोंडी

अकोला: कोरोनाच्या अनुषंगाने शहरात जमावबंदी असली तरीही विविध मार्गावर ऑटाेचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. यामध्ये शहराचा परवाना नसलेल्या ऑटोची संख्या लक्षणीय असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वाहतूक शाखेचे पोलीस लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला: जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या गोडबोले उद्यानाजवळ मार्गावर बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून आहे. यामध्ये रेती, वीट, गिट्टीचा समावेश असून अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.

बॅरिकेडचा खटाटोप कशासाठी ?

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी असून उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरतो. अशा स्थितीत पोलीस प्रशासनाने शहरातील गांधी चौक, खदान पोलीस ठाणे यासह प्रत्येक मुख्य चौकात बॅरिकेड उभारले आहे. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.

अकोटफाईल चाैकात खोदला खड्डा

अकोला: शहरातील अकोटफाईल चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचला आहे. या चौकात मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला: तहसील कार्यालय ते महाराणा प्रतापबाग मार्गावरील हाेमगार्ड कार्यालयाजवळ रस्त्यालगत जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

नागरिकांसाठी 'ओपन स्पेस' मोकळ्या करा!

अकाेला: शहरात ले-आऊटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे गरजेचे आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वयोवृध्द नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसित करण्याची मागणी हाेत आहे. याकडे सत्तापक्ष भाजपचे दुर्लक्ष होत आहे.

'दररोज पाणीपुरवठा करावा'

अकोला:‘अमृत’योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु, दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमधये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १ मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.