‘आयपीएल’वर सट्टा लावणारे पाेलिसांच्या जाळ्यात; 'एलसीबी’ची कारवाई, नामवंत बुकी ‘नाॅटरिचेबल’

By आशीष गावंडे | Published: April 6, 2024 09:36 PM2024-04-06T21:36:18+5:302024-04-06T21:36:23+5:30

आयपीएल क्रिकेटवर शहरासह जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यात बसून सट्टा लावणारे, खायवळी करणारे सक्रिय झाले आहेत.

Bettors on 'IPL' in police custody; LCB's Action, Renowned Bookie 'Naturally Reachable' | ‘आयपीएल’वर सट्टा लावणारे पाेलिसांच्या जाळ्यात; 'एलसीबी’ची कारवाई, नामवंत बुकी ‘नाॅटरिचेबल’

‘आयपीएल’वर सट्टा लावणारे पाेलिसांच्या जाळ्यात; 'एलसीबी’ची कारवाई, नामवंत बुकी ‘नाॅटरिचेबल’

अकाेला: एकीकडे लाेकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच क्रिकेट विश्वात ‘आयपीएल’क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. यावर विविध भागात  सट्टा लावणारे नऊ आराेपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याविराेधात शनिवारी कारवाइ करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य कारवाइपाेटी अनेक नामवंत बुकी ‘नाॅटरिचेबल’ झाल्याची माहिती आहे. 

आयपीएल क्रिकेटवर शहरासह जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यात बसून सट्टा लावणारे, खायवळी करणारे सक्रिय झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांनी गठीत केलेल्या पथकातील ‘पीएसआय’गाेपाल जाधव, भास्कर थोत्रे, खुशाल नेमाडे, रवि खंडारे, फिराेज खान, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मो. आमीर यांनी मागील पाच दिवसांच्या कालावधीत १७ आरोपींविराेधात कारवाई करून लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डाबकी रोड परिसरातील फुकटपुरा नेहरू नगर येथून विवेक नंदलाल मुंदडा (५१)रा. भुईभार हॉस्पीटल समोर रामदासपेठ याच्याकडून मोबाईल, टॅब व नगदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी डाबकी रोड पाेलिस ठाण्यात कलम १२ (अ) महा. जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात खायवाळी करणारे आरोपी दिनेश भुतडा, यश राजेश तिवारी दोन्ही रा. शेगाव, योगेश ओमप्रकाश अग्रवाल रा. साईनगर जि. अमरावती, रविंद्र मोतीराम दामोदर रा. रमेश नगर, डाबकीरोड, अमोल श्रीधर ठाकरे रा. नागझरी, प्रदीप सुर्यभान सोनटक्के रा. तेल्हारा, प्रविणसिंग राजपालसिंग चव्हाण रा. रजपुतपुरा ता. बाळापुर हे निष्पन्न झाले आहेत.

यादरम्यान, बार्शिटाकळी हद्दीतील कान्हेरी सरप येथील हॉटेल राजवाडाच्या मोकळया जागेत सट्टा खेळणारे आरोपी नामे शेख रमजान शेख कालु गौरवे (३४), वैभव पांडुरंग फड (३१) दाेन्ही राहणार मोठी विहीरजवळ खडकी अकोला यांना साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. 

माहिती द्या, नाव गाेपनिय ठेवणार!
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टयाबाबत माहिती असल्यास पाेलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गाेपनिय ठेवण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी केले आहे.

Web Title: Bettors on 'IPL' in police custody; LCB's Action, Renowned Bookie 'Naturally Reachable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.