शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

मुलींच्या भांडणाचा वाद: कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दोन दिवसांपूर्वी मनपा शाळा क्रमांक ४ मध्ये मुलींच्या भांडणाच्या वादातून आरोपी राजा नासिर खान याने मोहम्मद अली रोडवरील कापड दुकानात घुसून युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. फतेह चौकात राहणारा आवेश खान इकबाल खान (१८) याच्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलाचे मोहम्मद अली रोडवर कापड दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची लहान बहीण आऐशा फातिमा आणि आरोपी राजा नासिर खान याची मावस बहीण उम्मे अम्मारा यांच्यात मनपा शाळा क्रमांक ४ येथे भांडण झाले होते. त्याची तक्रार आवेश खानच्या आईने कोतवाली पोलिसात दिल्यामुळे संतप्त झालेला आरोपी राजा नासिर खान हा मंगळवारी रात्री कापड दुकानावर आला. यावेळी आवेश खान दुकानावर हजर होता. त्याचे वडील इकबाल खान हे कापड खरेदीसाठी बाहेरगावी गेले होते. यावेळी राजाने आवेश खान याला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कमरेजवळील पिस्तूल काढून आवेशच्या कानशिलावर लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु येथे उपस्थित तौसिफ खान, रईस खान, सोहेल खान आणि रफिक खान यांनी आरोपी राजा नासिर खान याची समजूत घातली आणि त्याला पाठवून दिले. आवेशच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी राजा खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0७, आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.पोलीस कारवाईत आरोपी राजाचा अडथळाआवेश खान याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी राजा नासिर खान याला अटक करण्यासाठी बैदपुऱ्यातील लाल बंगला येथे गेलेल्या कोतवाली पोलिसांच्या पथकाला राजाच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी अडथळा निर्माण केला आणि पोलिसांना आरोपीच्या घरात जाण्यापासून रोखले. कुटुंबीयांनी आतून दरवाजा बंद करून राजाला पळवून जाण्यासाठी मदत केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलीस शिपाई मोहम्मद नदीम नूर मोहम्मद यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी आरोपी नासिर खान याच्यासह चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.