शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक संचालक हिवताप विभागातील कर्मचा-याची उचलबांगडी

By admin | Updated: December 8, 2014 01:20 IST

आरोग्य उपसंचालकांनी दिले चौकशीचे आदेश.

अकोला : सहाय्यक संचालक हिवताप विभागात एकाच ठिकाणी ३0 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व महिला कर्मचार्‍यांना असभ्य वागणूक देणार्‍या नासीर हुसेन नामक कर्मचार्‍याची उचलबांगडी करुन त्याला त्याच्या मुळ पदावर हिवताम विभागात परत पाठविण्यात आले आहे. ह्यलोकमतह्णने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन रविवारी सुटीचा दिवस असूनही चौकशीचे आदेश दिले.नासीर हुसेन या कर्मचार्‍याची पदस्थापना जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून आहे. सदर कर्मचार्‍यास सहाय्यक संचालक हिवताप विभागात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते. सदर कर्मचारी गत ३0 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. हिवताप विभाग सहाय्यक संचालक कार्यालयातील अधिकारी व एका कर्मचार्‍याने महिला कर्मचार्‍यांचा छळ मांडल्याचा आरोप एका महिला अधिकार्‍याने आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या तक्रारीत केला होता. महिला कर्मचार्‍यांचे वेतन रोखणे, बदलीच्या धमक्या देणे व अश्लील संभाषण हा प्रकार ह्यबिझनेस ब्लॅकमेलिंगह्णचाच असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. लोकसेवा आयोगाद्वारे वर्ग दोनच्या पदावर लागलेल्या सदर महिला अधिकार्‍याचे वेतन रोखण्याचे अधिकार नसतानाही वेतन रोखण्याचा प्रताप सहाय्यक संचालक हिवताप डॉ.एम.एम. राठोड यांनी केला. तसेच सदर महिला अधिकार्‍याशी नासीर हुसेन या कर्मचार्‍याने असभ्य वर्तणूक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्या त आला होता. हा प्रकार ह्यलोकमतह्णने उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी सहाय्यक संचालक हिवताप विभागात कार्यरत असलेल्या नासीर हुसेन नामक कर्मचार्‍याची प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करून त्यांना जिल्हा हिवताप विभागात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच महिला अधिकार्‍याचा छळ केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.