शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण आज अकोल्यात

By admin | Updated: November 19, 2014 02:06 IST

काँग्रेसमध्ये धुसफूस; अकोला जिल्ह्यात कॉँग्रेस नेत्यांपुढे पक्षबांधणीचे आव्हान.

अकोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण बुधवारी प्रथमच अकोल्यात येत आहेत. त्यांच्या दौर्‍यात कॉँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी जिल्ह्यात कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अकोला पश्‍चिम मतदारसंघात उमेदवारीवरून ह्यपॅनलह्णच तयार करण्यात आले होते. उमेदवारी न मिळाल्याने अकोला पश्‍चिममध्ये पक्षांतर झाले, तर काहींनी पदाचे राजीनामे दिले. आकोट मतदारसंघात प्रचारासाठी अकोल्यातील पदाधिकारी आयात करावे लागले. अकोला पश्‍चिममध्ये तर १0 आजी-माजी पदाधिकार्‍यांवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. निवडणुकीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, मूर्तिजापूर, बाळापूर आणि आकोट या पाचही मतदारसंघांमध्ये कॉँग्रेसचा पराभव झाला होता. दरम्यान, बुधवारी इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अकोल्यात येत आहेत. दुपारी १ वाजता स्वराज्य भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजी-माजी आमदार, पदाधिकारी, विविध सेलचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमातच काही पदाधिकारी निवडणुकीतील कामगिरी, गटतटावरून आपली नाराजी चव्हाणांपुढे व्यक्त करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये १0 पदाधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर राजीनाम्याचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर दोन पदाधिकार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीही राजीनामे दिले होते. काही पदाधिकार्‍यांनी तर पक्षाच्या बैठकीतच स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर उदय देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत देत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. आता पक्षबांधणी करताना जिल्ह्यातील कॉँग्रेस नेते अंसुतष्ट आणि पक्षापासून दूर गेलेल्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील की नाही, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच.