शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘कलाविष्कार’ प्रदर्शन ठरले सृजनशिलतेचे वैभव!

By admin | Updated: August 23, 2016 01:01 IST

७५ चित्रकारांच्या १५४ कलाकृती प्रदर्शित; १२ चित्रकृती जाणार परदेशात.

अकोला, दि. २२: येथील त्रिमती कलादालनात झालेले ह्यकलाविष्कार-२0१६ह्ण हे प्रदर्शन सृजनशिलतेचे वैभव ठरले आहे. तब्बल ७५ कलाकारांच्या १५४ कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या, त्यापैकी १८ चित्रकृती या परदेशामध्ये जाणार असल्याने अकोल्यातील हे प्रदर्शन कलावंतांसह कलाक्षेत्रासाठी ऊर्जादायी ठरले आहे. जगप्रसिद्ध कलावंत सतीश पिंपळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कलाविष्कार सोहळय़ाला ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ.नानासाहेब चौधरी, प्रशांत देशमुख, अमेरिकेत वास्तव्याला असलेले विजय आळशी, प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, प्राचार्य गजानन बोबडे आदी उपस्थित होते. सतीश पिंपळे यांनी व्यक्तीचित्राचे प्रात्यक्षिक सादर करून या प्रदर्शनाची सुरुवात केली . या प्रदर्शनात ७५ चित्रकारांनी सहभाग नोंदवित १५४ कलाकृती प्रदर्शित केल्या, तसेच २ शिल्पकृतीही ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनातून १८ चित्रकारांच्या २0 कलाकृती एकाच संग्रहाकाने विकत घेऊन मानाचा तुरा रोवला असून, यामधील १२ चित्रकृती परदेशात जाणार आहेत. यावेळी बोलताना पिंपळे यांनी चित्रकला विश्‍व संभ्रमावस्थेत असल्याचे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. या कलेचा जीवनाच्या कोणकोणत्या पातळीवर उपयोग होतो, हे विषद करीत असतानाच पिंपळे यांनी या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत केले. पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणेच विदेशांमध्ये चित्रांचीही लायब्ररी असते, हे सांगुन त्यांनी अकोल्यातील चित्रकला विश्‍व हे समृद्ध असल्याचा अभिमान व्यक्त केला. या प्रदर्शनासाठी खास अमेरिकेतून आलेले विजय आळशी यांनी भारत हे कलेचे माहेर घर आहे, त्याचा येणार्‍या पिढीने विसर पडू देऊ नये, असे सांगितले. या प्रदर्शनाचा समारोप खामगावचे कलावंत संजय गुल्हाने यांनी काढलेल्या व्यक्तीचित्राने झाला.