शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर युक्तिवाद पूर्ण, आज निर्णयाची शक्यता

By admin | Updated: July 15, 2015 23:30 IST

अकोल्यातील युवकाचा लैंगिक छळ प्रकरण.

अकोला : भारतीय सेवा सदनद्वारा संचालित राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका रोजंदारी कर्मचारी युवकाचा सतत ८ वर्ष लैंगिक छळ करणारे सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका व माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयामध्ये बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून, यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. पीडित रोजंदारी कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार, भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांनी त्याला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आमिष दाखवून, २00८ पासून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडित युवकाने या प्रकाराचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केल्यानंतर, पोलिसांकडे तक्रारही दिली. त्यानुसार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गोयनका आणि रूंगटा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला असून, त्यांच्या अर्जावर बुधवारी व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, गुरुवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. मुन्ना खान आणि अँड. बी. के. गांधी यांनी, तर सरकार पक्षातर्फे अँड. मो. परवेज दोकडिया यांनी कामकाज पाहिले.

*बचाव पक्षाद्वारे ४0 मिनिटं युक्तिवाद

          लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांना जामीन देण्यात यावा, यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर ४0 मिनिट युक्तिवादं केला. यामध्ये अँड. मुन्ना खान यांनी बचाव पक्षाची बाजू मांडण्यासाठी ३0 मिनिट वेळ घेतला, तर अँड. बी. के. गांधी यांनी १0 मिनिट युक्तिवाद केला. पीडित युवकाने केलेले आरोप हे बिनबुडाचे असून, खोटे व पूर्वनियोजित असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले. सरकार पक्षाचे अँड दोकडिया यांनी हे प्रकरण गंभीर असून, लैंगिक छळाच्या चित्रफीतीमधील सत्यता लक्षात घेता दोन्ही आरोपींचा जामीन फेटाळण्याची मागणी केली.