शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची लगबग; बैठकांना ऊत

By admin | Updated: October 1, 2014 01:24 IST

अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक.

आशिष गावंडे / संतोष येलकर अकोला- जिल्ह्यात विधानसभेची पहिल्यांदाच पंचरंगी लढत होत असल्यामुळे निवडणूक रिंगणातील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारासाठी अवघ्या तेरा दिवसांचा अवधी मिळत असल्याने वेळ न दवडता उमेदवारांनी घरोघरी जाऊन बैठकांना सुरुवात केल्याचे चित्र आहे. आजपर्यंत कधीही विचारपूस न झालेल्या कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करण्यासोबतच नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत.राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप, शिवसेनेच्यावतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जात असल्याने आजपर्यंत गळ्य़ात गळे घालून एकमेकांसाठी मतांचा जोगवा मागणार्‍या उमेदवारांची प्रचंड कोंडी झाली आहे. युती असो वा आघाडी, जाहीर कार्यक्रमांमध्ये सहकार्‍यांना कोपरखळी मारून जनतेचे मनोरंजन करणारेच आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात दंड थोपटून आहेत. साहजिकच, संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांंनादेखील पेच पडला असून, आजवर ज्या उमेदवारांसाठी खांद्यावर झेंडा घेऊन राजकीय वातावरण निर्मिती केली, त्याच उमेदवाराच्या विरोधात आवाज काढावा लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत सापडलेले कार्यकर्ते सैरावरा झाल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व बाबींची जाण निवडणूक रिंगणातील उमेदवारांना असल्याने कार्यकर्त्यांची समजूत घालताना, त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे. ह्यत्याह्ण उमेदवारापेक्षा मीच कसा तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवून विकास कामांना गती देऊ शकतो, अशा स्वरूपाच्या आश्‍वासनांची खैरात केल्या जात आहे. १ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, १३ ऑक्टोबरपर्यंंत प्रचार करण्याचा अवधी राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. प्रचाराचा अल्प कालावधी लक्षात घेता व अद्यापी जाहीर सभांना सुरुवात न झाल्यामुळे उमेदवारांनी घरोघरी जाऊन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.