शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By admin | Updated: January 22, 2015 00:52 IST

राज्यपाल नामनिर्देशित आमदार सदस्य कायम.

अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केल्या असून, नव्याने या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याने सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सदस्यपद मिळविण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र आहे.राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पररभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर आणि डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी हे चार कृषी विद्यापीठ असून, कृषी विद्यापीठाचे धोरणात्मक निर्णय, अर्थसंकल्प, पदभरतीचे निर्णय आदीसर्वच धोरणात्मक बाबींवर कार्यकारी परिषदेची संमती आवश्यक असते. या कार्यकारी परिषदेवर शासकीय आणि अशासकीय मिळून २२ सदस्य असतात. यामध्ये या परिषदेचे अध्यक्ष कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव हे पदसिध्द सचिव असतात तसेच राज्यपाल नामनिर्देशीत तीन विधानसभा तर दोन विधान परिषद सदस्य आणि एक कृषी शास्त्रज्ञ गटातील सदस्याचा समावेश असतो. उर्वरित शासकीय सदस्य असतात. अशासकीय सदस्यांमध्ये चार प्रगतीशिल शेतकरी,दोन स्थानिक स्वराज्य संस्था आणि एक उद्योजक यांची निवड केली जाते. राज्याचे कृषीमंत्री हे कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती असल्याने अशासकीस सदस्यांची निवड कृषीमंत्री करतात. या सर्व अशासकीय सदस्यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली असून, काँग्रेस आघाडी सरकारने नियु्क्त केलेल्या नेमणुकीला दणका दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती यांनी कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांची निवड रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्याचे स्पष्ट क रून राज्यपाल नामनिर्देशीत सदस्य कायम असून, नुकतीच या सदस्यांच्या उपस्थितीत कार्यकारी परिषदेची सभा घेण्यात आली असल्याचे सांगीतले. *राज्यपाल नामनिर्देशित सदस्य कायम अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांची झालेली निवड रद्द केल्याचे शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. या कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित विद्यमान विधान परिषद सदस्य गोपिकीशन बाजोरीया आणि अमरीश पटेल यांच्यासह शास्त्रगटातील डॉ. जयंत देसाई सदस्य कायम आहेत.