शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

अन् महापालिकेला जाग आली

By admin | Updated: May 13, 2014 22:11 IST

बनावट गुंठेवारीच्या प्रस्ताव प्रकरणी मनपाने उपविभागीय कार्यालयाला प्रस्तावाची विचारणा करणारे साधे पत्रही न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाला जाग आली असून, नगर रचना विभागाने उपविभागीय कार्यालयाला पत्र देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

अकोला : महापालिकेतील नगर रचना विभाग व उपविभागीय कार्यालयातून तयार करण्यात आलेल्या बनावट गुंठेवारीच्या प्रस्ताव प्रकरणी मनपाने उपविभागीय कार्यालयाला प्रस्तावाची विचारणा करणारे साधे पत्रही न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाला जाग आली असून, नगर रचना विभागाने उपविभागीय कार्यालयाला पत्र देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.
वाशिम बायपास परिसरातील शेत सर्व्हे नं.४२/१ मधील तीन एकर जागेचे बनावट गुंठेवारी प्रकरण उघडकीस येताच मनपा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. नगर रचना विभागात बनावट प्रस्ताव सादर करून तो परस्पर तयार करण्यात आला. पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई वसंतराव औतकरतर्फे गोविंद शंकरलाल बजाज यांच्या नावाने गुंठेवारीचा प्रस्ताव तयार झाला. यामध्ये महापालिका प्रशासनासह उपविभागीय कार्यालयातून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. ही बाब गंभीरतेने घेत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सौ. औतकर यांच्यासह गोविंद बजाज यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला. यादरम्यान, मनपामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो उपविभागीय कार्यालयातूनदेखील मंजूर झाल्याने मनपाने यासंदर्भात उपविभागीय कार्यालयाला पत्र देऊन खुलासा मागवणे क्रमप्राप्त होते; परंतु प्रशासनाने असे कोणतेही पत्र उपविभागीय कार्यालयाला दिलेच नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटताच, प्रशासनाला जाग आली. याविषयी पत्र देण्याची तयारी मनपाने सुरू केल्याची माहिती आहे.