अकोट : शेतामध्ये फवारणीतून विषबाधा; शेतमजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:59 IST2017-12-13T02:58:44+5:302017-12-13T02:59:16+5:30

अकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. 

Akot: spraying poisoning in the field; The death of the laborer | अकोट : शेतामध्ये फवारणीतून विषबाधा; शेतमजुराचा मृत्यू

अकोट : शेतामध्ये फवारणीतून विषबाधा; शेतमजुराचा मृत्यू

ठळक मुद्देशेतामध्ये फवारणी क रित असताना झाली विषबाधा१२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालागोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. 
ढबळगाव वेटाळ येथील गोविंद मणिराम अस्वार हे ५ डिसेंबर रोजी शेतात तुरीवर फवारणीकरिता गेले होते. फवारणी करून परत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटल्याने अकोट येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना १२ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. अकोट तालुक्यात आतापर्यंंत चौघांचा फवारणीच्या विषबाधेने मृत्यू झाला आहे.

Web Title: Akot: spraying poisoning in the field; The death of the laborer