शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!

By admin | Updated: September 18, 2014 02:18 IST

‘लोकमत’च्या व्यासपीठावर महापौर, उपमहापौरांची ग्वाही

अकोला : महापालिकेच्या स्थापनेला १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना अद्यापपर्यंत अकोलेकरांना साध्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. विकास कामे तर होतीलच; परंतु नागरिकांची खरी गरज लक्षात घेता, अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांनाच प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची ग्वाही महापौर उज्ज्वला देशमुख व उपमहा पौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर दिली. अकोला शहराच्या विकासासाठी मागील १३ वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे. मोठय़ा आवेशात विकासाच्या गप्पा होत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. एकीकडे विकास कामांचे दिवास्वप्न रंगविल्या जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेतल्यास प्रशासनाच्या प्रामाणिकतेची कीव येते. पथदिवे बंद असले तरी त्यांचे कोट्यवधींचे देयक नित्यनेमाने अदा होते. शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण, अस्वच्छता अकोलेकरांच्या मुळावर उठली असून, प्रत्येक घराला आजाराचा विळ खा आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो. अकोलेकरांजवळून कर वसूल करणारी महापालिका नागरिकांना साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरल्याचे चित्र आहे. अर्थातच, अकोलेकरांना विकासापेक्षा मूलभूत सुविधांची जास्त निकड असल्याचे लक्षात येते. या सर्व मुद्यांवर भाजप-शिवसेना युतीच्या नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर सविस्तर चर्चा करीत त्यांची भूमिका विशद केली. यामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी काही संकल्पना प्र त्यक्षात राबविण्याचा मानस व्यक्त केला. प्रशासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांसह अकोलेकरांच्या समन्वयातूनच शहराचा विकास शक्य असल्याचे मत महापौर, उपमहा पौरांनी व्यक्त करीत विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलासपणे चर्चा केली.