शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर : नेत्र बुबुळांच्या संकलनात अकोला अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:21 IST

अकोला: गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे.

ठळक मुद्देगत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. जालना येथील गणपती नेत्रालयाला सर्वाधिक नेत्र बुबुळ संकलित करून देणारे अकोला शहराने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले. २0१६-१७ मध्ये २ हजार २४९ नेत्र बुबुळ संकलित झाले आणि गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.

- नितीन गव्हाळे

 अकोला: हळूहळू का होईना, नेत्रदानाचे महत्त्व जनमानसाला कळू लागले. नेत्रदान चळवळीला गती मिळू लागली. अकोलेकर धार्मिक कार्यातील योगदानासाठी जसे परिचित आहेत. तसे आता नेत्रदान चळवळीतील योगदानासाठी अकोलेकरांची ओळख बनत आहे. गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे.एकेकाळी नेत्रदान करण्याबाबत अनेक गैरसमज होते. अंधश्रद्धेचा पगडा होता; परंतु अकोल्यात १८८४ मध्ये डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी नेत्रदानाची चळवळ हाती घेतली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. निधन झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी गेल्यावर, त्या कुटुंबातील व्यक्ती अपमानित करायच्या, हाकलून द्यायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. अकोल्यात डॉ. पनपालिया यांनी अकोला नेत्रदान संस्थेच्या माध्यमातून नेत्रतज्ज्ञ डॉ. जुगल चिराणिया यांनी रोटरी क्लबच्या आणि शहरातील काही सामाजिक संस्थांनी नेत्रदानाविषयी मोठी जनजागृती केली. त्याचेच फलस्वरूप जालना येथील गणपती नेत्रालयाला सर्वाधिक नेत्र बुबुळ संकलित करून देणारे अकोला शहराने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले. डॉ. पनपालिया, श्याम पनपालिया आणि रोटरी क्लबचे डॉ. जुगल चिराणिया यांच्या माध्यमातून दर महिन्याला १५ ते २0 जणांचे नेत्रदान करण्यात येते. अकोल्यातून वर्षाकाठी २६३ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. काही वर्षांमध्ये अकोल्यातून जालना येथील गणपती नेत्रालयामध्ये अडीच हजारावर नेत्र बुबुळ पाठविण्यात आले. या नेत्र बुबुळांच्या माध्यमातून शेकडो दृष्टिबाधितांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश निर्माण झाला. नेत्रदानाविषयी होत असलेली व्यापक जनजागृती लक्षात घेता, सामाजिक, धार्मिक संस्था आणि रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिक नेत्रदान संकल्पपत्र भरून देताना दिसतात. त्याचाच परिणाम, अनेक कुटुंबीय मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढे येत आहेत. नेत्रकमलांजली हॉस्पिटल किंवा रोटरी क्लबचे डॉ. चिराणिया यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करीत आहेत. हा दृष्टिबाधितांसाठी एक आशेचा किरणच आहे, असेच म्हणता येईल.राज्यातील नेत्र बुबुळ संकलनाचे प्रमाण घटलेराज्यात नेत्रदानाची मोठी जनजागृती होत असली, जाहिरातींवर मोठा खर्च होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत नेत्र बुबुळ संकलनाच्या संख्येत घट झाली आहे. शासनाच्या अहवालानुसार २0१५-१६ मध्ये ३ हजार २३0 नेत्र बुबुळांचे प्रत्यारोपण करण्यात आले.  २0१६-१७ मध्ये २ हजार २४९ नेत्र बुबुळ संकलित झाले आणि गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.१९८७ मध्ये झाले पहिले नेत्रदानअकोल्यात १९८४ पासून नेत्रदान चळवळीचे काम सुरू झाले. सुरुवातीला कोणीही मरणोत्तर नेत्रदान करायला तयार होत नव्हते; परंतु नेत्रदानाविषयी समाजात हळूहळू जनजागृती व्हायला लागली. दृष्टिदानाविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागला. त्यामुळेच १९८७ मध्ये गीतादेवी तोष्णीवाल यांचे पहिले नेत्रदान अकोल्यात झाले. त्यानंतर शहराचे तत्कालिन नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर, तत्कालिन खासदार नानासाहेब वैराळे, स्वातंत्र्य सैनिक आढे आदी दिग्गजांचेही मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.अंधश्रद्धेचा प्रचंड पगडामृत्युपश्चात नेत्रदान केल्यास पुढील जन्मात अंधत्व येते, अशी अजब अंधश्रद्धा समाजात आहे. पुनर्जन्म होत नाही. मोक्ष मिळत नाही, अशीही अंधश्रद्धा समाजात आहे. त्यामुळे नेत्रदान पुरेशा प्रमाणात होत नाही, असे नेत्रदान चळवळीत गेली ३0 वर्षांपासून काम करणारे डॉ. चंद्रकांत पनपालिया सांगतात.अकोल्यात नेत्रपेढीची परवानगी, अनुदान नाहीएकीकडे शासन नेत्रदान चळवळ रूजविण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु नेत्रदानाविषयी जनजागृती करणाऱ्या संस्थांना मात्र मदत करण्याबाबत शासनाचा आरोग्य विभाग उदासीन आहे. अकोल्यातील नेत्र बुबुळांचे संकलन पाहता, नेत्रपेढीची गरज आहे. अकोला नेत्रदान संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. नेत्रपेढीची शासनाकडे परवानगी मागितली. शासनाने परवानगी दिली; परंतु अनुदान दिले नाही आणि अनुदानाशिवाय नेत्रपेढी उभी राहू शकत नाही, त्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ तरी मिळणार कसे?दृष्टिबाधितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अकोला शहर आहे. सर्वाधिक नेत्र बुबुळ पुरविण्यामध्ये अकोला राज्यात अग्रस्थानी आहे. अकोलेकरांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळेच नेत्रदान चळवळीला चालना मिळाली आहे.डॉ. चंद्रकांत पनपालियाअध्यक्ष, अकोला नेत्रदान संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य