अकोला पोलीस आयुक्तालयाचा मार्ग मोकळा!

By Admin | Updated: February 27, 2015 00:32 IST2015-02-27T00:32:49+5:302015-02-27T00:32:49+5:30

मुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मंजुरी; नगरविकास राज्यमंत्र्यांची माहिती.

Akola Police Commissioner, open the way! | अकोला पोलीस आयुक्तालयाचा मार्ग मोकळा!

अकोला पोलीस आयुक्तालयाचा मार्ग मोकळा!

अकोला: अकोला पोलीस आयुक्तालयाची स्थापन आणि डीसी रूल मंजूर करून अकोला महापालिका हद्दीत एफएसआय १.७५ पर्यंत वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रस्तावांना ह्यग्रीन सिग्नलह्ण दिला असून, पोलीस आयुक्तालयासतत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती गृह (शहरे), नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. अकोल्यातील शिवणी विमानतळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला शहरात पोलीस आयुक्तालय व्हावे, यासाठी १९९७ पासून प्रयत्न सुरू होते. विधिमंडळाच्या गत हिवाळी अधिवेशनापासून दोन महिन्यांच्या कालावधीत अकोला पोलीस आयुक्तालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. बुधवारी झालेल्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकाकडून गृह मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठविण्यात आला. आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या पृष्ठभूमीवर अकोल्यात पोलीस आयुक्तालय स्थापनेसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला ह्यग्रीन सिग्नलह्ण दिला. अकोल्यात पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे पाटील उपस्थित होते. *घाण पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प; पोलिसांसाठी घरे बांधणार! अकोल्यातील मोर्णा नदीपात्रात जाणारे शहरातील घाण पाणी शुध्द करण्याचा प्रायोगिक प्रकल्प नाशिक येथील साईबाबा बहुद्देशीय संस्था आणि इंटरनॅशनल फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात येणार आहे. पोलिसांसाठी ५0 घरे बांधण्याचे कामदेखील या संस्थांकडून करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिली.

Web Title: Akola Police Commissioner, open the way!