शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पं.स.च्या चार सदस्यांचे सदस्यपद होणार बाद?

By admin | Updated: August 17, 2016 02:34 IST

मनपा हद्दवाढीचा सभापतींना फटका : बाजू मांडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी बजावली नोटीस

अकोला, दि. १६: महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये अकोला पंचायत समितीच्या चार गणाचे पूर्ण क्षेत्र जात आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद होण्याची शक्यता आहे. सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी बाजू मांडण्याकरिता शनिवार, २0 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी अकोला पंचायत समितीच्या सभापतींसह चार सदस्यांना १२ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली आहे.शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्राथमिक अधिसूचनेनुसार अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित मनपा हद्दवाढीमध्ये अकोला शहरानजिकच्या २४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे.त्यामध्ये अकोला पंचायत समितीच्या खडकी बु., मलकापूर भाग भाग-२, उमरी प्र.बाळापूर व शिवणी या चार गणांचे सर्व क्षेत्र हद्दवाढीत जात आहे. या पृष्ठभूमीवर या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अकोला पंचायत समिती सदस्यांच्या सदस्यत्वाबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असून, पंचायत समितीच्या संबंधित गणाच्या चार सदस्यांची बाजू समजून घेण्यासाठी शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार पंचायत समितीचे सदस्यपद रद्द करण्यापूर्वी, पंचायत समितीच्या संबंधित चार सदस्यांची बाजू जिल्हाधिकारी समजून घेणार आहेत. या संदर्भात बाजू मांडण्यासाठी २0 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोला पंचायत समितीच्या चार सदस्यांना बजावली आहे. त्यामध्ये पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह चार सदस्यांचा समावेश आहे.