शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपाची सत्ता! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:45 IST

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पूर्णपणे एकहाती सत्ता मिळवली आहे. 

८० जागांसाठी झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. ८० जागांपैकी ७९ जागांचे निकाल लागले आहेत. त्यापैकी भाजपाने ४१ जागा जिंकल्या आहेत. अकोला महापालिकेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, तर वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेनेला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. 

अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेसने १९ जागा जिंकल्या आहेत. स्वतंत्र लढत असलेल्या शिंदेसेनेला फारचा करिष्मा करता आलेला नाही. उद्धवसेनेचीही कामगिरी साधारणच राहिली आहे. भाजपासोबत युतीत लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. 

अकोला महापालिका निकाल : एकूण जागा- ८०, निकाल ७९ 

भाजप - ४१

काँग्रेस - १९

शिंदेसेना- ००

उद्धवसेना- ०२

राष्ट्रवादी (अजित पवार)-०१

राष्ट्रवादी (शरद पवार)-०३

वंचित बहुजन आघाडी - ५

महानगर विकास समिती-४

एआयएमआयएम-०३

अपक्ष -०१

प्रभाग १७ मधील एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे.

२०१७ मध्ये काय लागला होता निकाल?

अकोला महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपाने ४८ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस १३ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. 

त्यावेळी अखंड असलेल्या शिवसेनेला ८ जागाच जिंकता आल्या होत्या. अखंड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा, तर एआयएमआयएमने एक जागा जिंकली होती. ५ अपक्ष उमेदवार जिंकले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Akola Municipal Elections 2026; Congress, Shiv Sena Trail

Web Summary : BJP retained power in Akola Municipal Corporation, winning 41 of 79 seats. Congress secured 19 seats, while both Shiv Sena factions and NCP (Ajit Pawar) underperformed. VBA won 5 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस