शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

अकोला मनपा आयुक्त सरसावले; अतिक्रमणावर हतोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:01 AM

अकोला : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मलकापूर शेतशिवारात मंजूर नकाशाव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम केले होते. सदर बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामाला सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार मंगळवारी नगररचना विभागाने त्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. 

ठळक मुद्देअनधिकृत इमारतीचे पुन्हा बांधकाम करणे भोवले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मलकापूर शेतशिवारात मंजूर नकाशाव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम केले होते. सदर बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामाला सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार मंगळवारी नगररचना विभागाने त्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. मलकापूर शेतशिवारातील व्हीएचबी कॉलनीसमोर शहरातील व्यावसायिकाने भूखंड क्रमांक २६, २७, २८ व २९ येथील जागेवर बांधकाम सुरू केले होते. सदर बांधकाम मंजूर नकाशाव्यतिरिक्त जास्त असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर नगररचना विभागाच्यावतीने इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तसेच उर्वरित अनधिकृत बांधकाम सदर व्यावसायिकाने स्वत: तोडावे अशी सूचना प्रशासनाने केली होती. मात्र या बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम न पाडता काही कालावधीनंतर पुन्हा बांधकामाला सुरुवात केली. हा प्रकार महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या समोर येताच त्यांनी सदर इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले. त्यानुषंगाने नगररचना विभागाने जेसीबीच्या मदतीने इमारतीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई करीत बांधकाम व्यावसायिकाला  तंबी दिल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका