शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पारा ४५ अंशावर

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

घामाच्या धारांनी अकोलेकर हैरान

अकोला : तापत्या उन्हाचा पारा शुक्रवारी ४५ अंशावर पोहोचल्याने, प्रचंड उकाड्यात घामाच्या धारांनी अकोलेकर हैरान झाल्याचे जाणवत होते. तसेच कडाक्याच्या उन्हामुळे सूर्य आग ओकू लागल्याचा अनुभव येत होता.
गेल्या १ जूनपासून पावसाळा सुरू झाला असला तरी, मान्सून दाखल होणे अद्याप बाकी असताना, तापत्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाचा कडका आणि अधून-मधून ढगाळ वातावरण, अशा वातावरणात उकाड्याने वैतागल्याचा अनुभव गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना येत आहे. शुक्रवार, ६ जून रोजी तर तापत्या उन्हाने कहरच केला, अकोल्याच्या तापमानाचा पारा ४५ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला. अंगाची लाही-लाही करणार्‍या तापत्या उन्हामुळे सूर्य आग ओकू लागल्याचा अनुभव येत होता. उन्हाच्या कडाक्यात प्रचंड उकाड्याने घामाच्या धारांनी अकोलेकर वैतागल्याचे चित्र दिसत होते. तापत्या उन्हामुळे प्रचंड उकाड्यामुळे नागरिक वैतागले असतानाच, वीज भारनियमनाच्या कालावधीत काही भागात तर प्रचंड उकाड्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक अक्षरश: वैतागल्याचे चित्र दिसत होते.