शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

जनता भाजी बाजार, जुन्या बस स्टॅँडच्या जागेवरील प्रकल्पाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:03 IST

यामागे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.

- आशिष गावंडे

अकोला: शहरातील जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्यासह गांधी जवाहर बगिच्यालगत असणाऱ्या मैदानावर आॅडिटेरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. या तीनही जागेच्या बदल्यात मनपाला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेत या प्रकल्पाला ‘ब्रेक’ लावला असला तरी यामागे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे रखडलेला प्रस्ताव कसा मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा असून, त्यावर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक संकुलांपासून प्रशासनाला महसूल प्राप्त होतो. मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीत सुधार व्हावा, यासाठी माजी महापौर विजय अग्रवाल यांनी शहरातील निवडक आरक्षित जागांवर कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. शहरातील जनता भाजी बाजारच्या जागेवर कमर्शिअल कॉम्पलेक्स व भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुने बसस्थानकाच्या जागेवर सिटी बसस्थानक व व्यावसायिक संकुलाचे आरक्षण आहे. गांधी जवाहर बागेलगतच्या मैदानावर आॅडिटेरिअम हॉलचे आरक्षण आहे. या तीन जागेचा विकास करण्यासाठी विजय अग्रवाल यांनी तत्कालीन राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केले असता, शासनाने मंजुरी दिली होती.अधिकारांचा वापर; विकासाला खोडाभाजपातील गटबाजी जगजाहीर असली तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचे चित्र आहे. या तीन जागांवर उभारल्या जाणाºया वास्तूंमुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. पक्षांतर्गत गटबाजी व अधिकाराच्या गैरवापरातून जिल्हा प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर झाल्यामुळेच सदर प्रकल्पाला पद्धतशीरपणे ‘ब्रेक’ लावण्यात आल्याची माहिती आहे. जुने बसस्थानक

  • आरक्षण क्रमांक १०३, वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानक
  • एकूण क्षेत्रफळ- १ लक्ष ४ हजार ७५ चौरस फूट
  • जमा होणारी रक्कम- ७ कोटी ३९ लक्ष ९३ हजार

जनता भाजी बाजार

  • आरक्षण क्रमांक २०३, वाणिज्य संकुल व भाजी बाजार
  • एकूण क्षेत्रफळ- २.४७ हेक्टर आर
  • जमा होणारी रक्कम- १८ कोटी ८० लक्ष ३५ हजार

 आॅडिटेरिअम

  • आरक्षण क्रमांक १९८, आॅडिटेरिअमची उभारणी
  • जमा होणारी रक्कम- ३ कोटी ७ लक्ष २ हजार

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका