‘कोरोना’साठी अकोला जीएमसीत ‘आयसोलेशन’ वॉर्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:42 AM2020-01-31T11:42:01+5:302020-01-31T11:42:18+5:30

- प्रवीण खेते अकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड ...

In Akola GMC Isolation Ward for 'Corona' | ‘कोरोना’साठी अकोला जीएमसीत ‘आयसोलेशन’ वॉर्ड!

‘कोरोना’साठी अकोला जीएमसीत ‘आयसोलेशन’ वॉर्ड!

Next

- प्रवीण खेते
अकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड जुन्या टीबी वॉर्डात तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरचीदेखील सुविधा करण्यात येणार आहे. हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांसाठी उपयोगात येणार असल्याची माहिती अधिष्ठात डॉ. शिवहरी घोरपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोना व्हायरसचा राज्यात एकही रुग्ण आढळली नसला, तरी राज्यात आरोग्य विभाग सतर्कता बाळगत आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. त्या अनुषंगाने अकोल्यातही आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र आयसोलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड जुन्या टीबी वॉर्डात तयार केला जाणार असून, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधादेखील केली जाणार आहे. हा वॉर्ड रुग्णालयापासून सुरक्षित अंतरावर असल्याने इतर रुग्णांचा कोरोनाच्या रुग्णांशी संपर्कयेणार नाही.

मनुष्यबळही उपलब्ध करून देणार
आयसुलेट वॉर्डासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी यांनी मान्यता दिली असून, वॉर्डासाठी परिचारिकांची ड्युटी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांचा अभाव
आयसुलेट वॉर्डात रुग्णसेवा देणाºया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधणांची गरज आहे. सद्यस्थितीत जीएमसीत कुठल्याच प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत; मात्र दोन दिवसात मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना मार्गदर्शन
रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकाºयांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांनी काय काळजी घ्यावी, या संदर्भात गुरुवार ३० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. विनीत वरठे यांच्यासह अधिसेविका, अधिपरिचारिका तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना व्हायरसचा धोका पाहता जीएमसीत जुन्या टीबी वॉर्डात आयसुलेट वॉर्ड निर्मिती केली जात आहे. त्यामुळे आवश्यक सुरक्षा साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. सध्या तरी हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात येत आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

 

Web Title: In Akola GMC Isolation Ward for 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.