शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याला मिळणार ‘लाल दिवा’?

By admin | Updated: October 21, 2014 00:22 IST

गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता.

अकोला- राज्यातील सत्ता आणि जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांचे समीकरण गत दोन्ही निवडणुकांमध्ये जुळून न आल्यामुळे अकोला जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले होते. यावेळी मात्र जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदार मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. पाडव्याला राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. या सोहळ्य़ात अकोला जिल्ह्यातील दोन आमदारांपैकी एकाला श पथ घेण्याची संधी मिळू शकते. विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झालेत. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मतदारांनी कौल दिला. स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजपकडून सत्ता स्था पनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भाजपकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालकांकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी प्रस्ताव पाठविल्यास पाडव्याच्या मुहूर्तावर नवे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकते. या मंत्रिमंडळात अकोल्यालाही स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आ. गोवर्धन शर्मा आणि आ. प्रकाश भारसाकळे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.*२00४ नंतर प्रथमच मंत्रिमंडळात अकोला?काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दोन्ही वेळा अकोला जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. २00४ पासून अकोला जिल्हा मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे. डॉ.दशरथ भांडे यांच्यानंतर जिल्हय़ातील कोणत्याही आमदाराला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. १९९९ मध्ये निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्याला त्यावेळच्या सरकारमध्ये बाबासाहेब धाबेकर, रामदास बोडखे आणि डॉ. दशरथ भांडे, असे तीन मंत्री मिळाले होते. त्यानंतर मात्र जिल्ह्याची पाटी कोरीच राहिली.*गडकरी आश्‍वासन पाळणार का?निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आकोट येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकाश भारसाकळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्‍वासन दिले होते. आकोट मतदारसंघातील मतदारांनी गडकरींच्या शब्दावर विश्‍वास ठेवत भारसाकळे यांना निवडून दिले. आता गडकरी त्यांचे आश्‍वासन पाळतात काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर सभापतीपदही अकोल्यात?नवीन मंत्रिमंडळात अकोल्याला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेत गोवर्धन शर्मा आणि प्रकाश भारसकाळे हे दोन्ही आमदार आहेत. गडकरींनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे भारसाकळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास पक्षातील ज्येष्ठ आमदार म्हणून गोवर्धन शर्मा यांचा विधानसभेचे सभापती म्हणून विचार होऊ शकतो. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. शर्मासुद्धा मंत्रिपदापेक्षा सभापतीपदासाठीच जास्त उत्सुक असल्याचे समजते.