शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:52 IST

उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे.

अकोला: मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जानेवारी २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीने सिटी बस सेवेचा मोठा गाजावाजा केला. त्यावेळी शहरवासीयांच्या सेवेत ३५ बसचा ताफा दाखल होणार होता. ३५ बस तर सोडाच, उण्यापुऱ्या २० बसचा गाडा हाकताना अवघ्या वर्षभराच्या कालावधीत श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या नाकीनऊ आले आहेत. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना मानसिक त्रास होत असताना मनपा प्रशासनाने साधलेली चुप्पी अनेकांना खटकत आहे.मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत २००१-०२ मध्ये अकोलेकरांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला होता. त्यावेळी मनपाच्या स्तरावर शहरात पहिल्यांदा शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. एका स्थानिक संस्थेने बस सेवेचा कंत्राट घेतला होता. सुरुवातीला सहा वर्षे ही सेवा अखंड सुरू होती. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बस सेवा कोलमडली. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बस सेवा रुळावर आणण्याचे प्रयत्न केले. अखेर २०१३ पासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ३५ शहर बसचा करारनामा तयार करून निविदा प्रकाशित केली असता, ती श्रीकृपा ट्रॅव्हल्सने सादर केली. जानेवारी २०१७ मध्ये अवघ्या पाच बसच्या मदतीने ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी शहरात थातूरमातूर बस सेवा सुरू केली. त्यानंतर १५ बसचा ताफा आणण्यात आला. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीतच ट्रॅव्हल्सच्या संचालकाने बँकेचे कर्ज फेडल्या जात नसल्याची सबब पुढे करीत मनपासमोर गुडघे टेकले आणि ६ जून २०१९ रोजी बस सेवा बंद केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून कर्जाची परतफेड केली जात नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीपासूनच रडगाणे!मनपाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सची निविदा मंजूर केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये ३५ बसचा ताफा शहरात दाखल होणार होता. पहिल्या टप्प्यात केवळ ५ बस आणण्यात आल्या. त्यासाठी १ जानेवारी २०१७ चा मुहूर्त उजाडला. उर्वरित ३० बस फेबु्रवारी महिन्यात दाखल होतील, असा दावा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनंतर १५ बस आणण्यात आल्या. उर्वरित १५ बस आजपर्यंतही शहरात दाखल झाल्याच नाहीत. तरीही संचालकांनी कर्जाची सबब पुढे करीत बस सेवा बंद केली, हे येथे उल्लेखनीय.अकोलेकरांमध्ये रोषशहर बस वाहतूक सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये सत्ताधारी भाजप तसेच मनपा प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांपासून बंद पडलेली बस सेवा सुरू करण्यासाठी सत्तापक्षासह प्रशासनाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सला विचारणा व निर्देश देणे अपेक्षित होते. तसे होत नसल्यामुळे ही बस सेवा सुरू होणार की नाही, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका