शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:39 AM

अकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्‍या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली.  अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. चिमुकल्या मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देकुटुंबातील एकुलती एक मुलगी चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्‍या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली.  अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. चिमुकल्या मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौलखेड परिसरातील नागे ले-आऊटमध्ये राहणारे सचिन संजीव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची अडीच वर्षाची मुलगी आराध्या ही दुपारी घराबाहेर रस्त्यावर खेळत होती. दरम्यान, घराशेजारीच राहणारे विजु खरे यांच्या मालकीच्या मालवाहू वाहनाने मुलीला धडक दिली. यात मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गत आठ दिवसांपासून चिमुकल्या आराध्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत होते; परंतु मंगळवारी दुपारी तिचा करूण अंत झाला.  सचिन कोकाटे यांची आराध्या ही एकुलती एक आणि घरात सर्वांची लाडकी होती.  तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. त्यांचा हल्लकल्लोळ पाहून उपस्थितानासुद्धा गहिवरून आले.  खदान पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी चालक विजु खरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचे एमएच ३0 एव्ही 00३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन पोलिसांनी जप्त केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAccidentअपघात