शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये किंकाळय़ा अन आक्रोश..

By admin | Updated: August 15, 2016 02:44 IST

मन सुन्न करणारी घटना; रुग्णालयात अनेकांचे डोळे पाणावले!

सचिन राऊत अकोला, दि. १४: मित्र नगरला लागून असलेल्या वसाहतमधील दोन चिमुकले खेळत असतानाच दोघांचाही पाण्यात बुडून अचानक मृत्यू झाल्याचे त्यांच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी सवरेपचार रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील बेडवर मृतावस्थेत असलेली दोन मुले जणू झोपलेली आहेत अशी अवस्था बघून त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश अन् किंकाळय़ांनी सवरेपचार रुग्णालय हेलावले.सिद्धार्थचे वडील मोलमजुरी करणारे; मात्र तरीही मुलगा हिंदू ज्ञानपीठसारख्या मोठय़ा शाळेत दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत होता तर कृष्णाचे वडील हॉटेलमध्ये काम करणारे; मात्र मुलगा गुरुनानक विद्यालयात चौथ्या वर्गाला शिक्षण घेत होता. दोघांच्याही वडिलांनी मुलांना अभियंता करण्याची स्वप्ने बघितली; मात्र नियतीने रविवारी दोघांच्याही स्वप्नांची राखरांगोळी केली. अचानक झालेल्या या घटनेने सिद्धार्थ आणि कृष्णाचे नातेवाईक स्तब्ध झाले. सिद्धार्थचे आई-वडील या घटनेने सुन्न होऊन सवरेपचारमध्येच कोसळले. तर कृष्णाचे आई-वडील बहिणीच्या डोळय़ातून अश्रूच्या धारा वाहतच होत्या. मनपा प्रशासन, जलवर्धन संस्था, नगरसेवक किं वा प्रशासकीय यंत्रणेची हलगर्जी या दोन बालकांच्या जिवावर उठली. आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. घरात दिवस-रात्र किलबिलाट आणि आई-वडिलांच्या अंगा-खांद्यावर खेळणारी बालके प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराचे बळी ठरले. अचानक घडलेल्या या घटनेने सवरेपचार रुग्णालयात या दोन्ही मुलांच्या आई-वडिलांचा आणि नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश होता. त्यांच्या किंकाळय़ा अन् आक्रोश बघता अनेकांची डोळे पाणावली. चिमुकले मृतावस्थेत आहेत यावर आई-वडिलांचा विश्‍वासही बसत नव्हता. एकदा तरी आई म्हणून हाक दे या आशेने त्यांचे आई-वडील पाणावलेल्या डोळय़ांनी मुलांच्या अंगा-खांद्यावर हात फिरवित होते.