शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; दहा हजारावर वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 6:41 PM

अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील एकूण ४९ हजार २६६ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी २६लाख ३४ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे थकीत देयकाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली आहे

अकोला: महावितरणच्याअकोला परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील एकूण ४९ हजार २६६ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी २६लाख ३४ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे थकीत देयकाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. सदर ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येत असून यामध्ये माहे फेब्रुवारीत ९ हजार ७०० तर मार्चमध्ये आतापर्यंत १ हजार ७०० थकबाकीदार ग्राहकांचा विदयुत पुरवठा तात्पुरता तथा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे संपुर्ण परिमंडळात जोरदारपणे राबविली जात आहे, यासंदर्भात शाखा, उपविभाग, विभागनिहाय अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र यांच्या बैठका घेण्याचे सत्र सुरु असून वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा दैनदिन आढावा घेतल्या जात आहे. सुट्ट्यांच्या दिवशी वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा प्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांच्या या चिंतेचे निराकरण महावितरणने फार पुर्वीपासून केले असून, वीज बील भरणा केंद्रांसोबत इतरही अनेक पर्याय वीज बील मिळण्यासोबतच वीज बिलांचा भरणा करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.पारंपारिक वीजबिल भरणा केंद्राच्या अनेक मयार्दा असतात, ही केंद्रे शासकीय सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतर बंद असतात यावर पर्याय म्हणून महावितरणने २४ तास सुरु असलेले महावितरण मोबाईल अ‍ॅप हे सर्वाधिक सशक्त पर्याय आहे. राज्यातील लाखो वीजग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरु केला आहे. यामुळे मोबाईल अ‍ॅपमुळे महावितरणची ग्राहकसेवा एका क्लिक्वर उपलब्ध झाली आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावरुनही आॅनलाईन वीज बिल भरणा करण्याची सुविधा २४ तास आहे.महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यामुळे नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण