खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

By Admin | Updated: May 31, 2017 01:32 IST2017-05-31T01:32:47+5:302017-05-31T01:32:47+5:30

उरळ: सख्ख्या मावसभावांनी बहिणीची गळा दाबून हत्या करणाऱ्या भावंडाची ३० मे रोजी पोलीस कोठडी संपली. मंगळवारी न्यायालयासमोर त्यांची कारागृहात रवानगी केली.

Accused in murder case in jail | खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ: अब्रू जाण्याच्या भीतीने सख्ख्या मावसभावांनी बहिणीची गळा दाबून हत्या करणाऱ्या भावंडाची ३० मे रोजी पोलीस कोठडी संपली होती. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
मोखा गावात भिकाबाई हिचा मावसभाऊ हरिभाऊ गुलाबराव घेंगे व बाळकृष्ण गुलाबराव घेंगे यांनी ७ मार्च २०१७ रोजी राहत्या घरात गळा आवळून खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच रात्री तिचे प्रेत भेंडवळच्या जंगलात जाळले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना उरळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी कोठडी संपल्याने उरळ पोलिसांनी त्यांना आज बाळापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात उरळ पोलीस करीत आहेत.

Web Title: Accused in murder case in jail