शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सत्र संपले ; विद्यार्थ्यांना मिळाला नाही 'स्वाधार' चा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:25 IST

पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम अद्याप मिळाली नाही.

- संतोष येलकर

 अकोला : गतवर्षीचे शैक्षणिक सत्र संपले असून, यावर्षीचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार ' योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना 'स्वाधार ' चा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.इयत्ता दहावीनंतर पुढील शिक्षण जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेणाऱ्या अनुसूचित जातीमधील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य खर्च भागविण्यासाठी दरवर्षी पात्र विध्यार्थ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी ४३ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येते . या योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील पात्र ठरलेल्या १ हजार ५०० विद्यार्थ्यांना अद्याप निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम मिळाली नाही. गतवर्षीचे शैक्षणिक सत्र संपले असून, यावर्षीचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना, शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील १ हजार ५०० विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून निधी केव्हा प्राप्त होणार आणि स्वाधार योजनेंतर्गत निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम जमा करण्यासाठी ८ कोटी रुपये निधीची मागणी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.-अमोल यावलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.शासनाकडून केव्हा मिळणार निधी?डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात निवास,भोजन व शैक्षणिक साहित्याची रक्कम जमा करण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून अध्याप उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र