विदर्भातील ७८ हजार शेतकऱ्यांनी केला ६४ कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:21 AM2021-03-25T10:21:20+5:302021-03-25T10:23:37+5:30

78,000 farmers in Vidarbha paid Rs 64 crore ७८ हजार शेतकऱ्यांनी ६४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा केला आहे.

78,000 farmers in Vidarbha paid Rs 64 crore | विदर्भातील ७८ हजार शेतकऱ्यांनी केला ६४ कोटींचा भरणा

विदर्भातील ७८ हजार शेतकऱ्यांनी केला ६४ कोटींचा भरणा

Next
ठळक मुद्देमहाकृषी ऊर्जा धोरणाला प्रतिसाद ३३ टक्के रक्कम विद्युत यंत्रणा सक्षमीकरणावर खर्च होणार

अकोला : जवळपास ६६ टक्के सवलत देऊन शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणाऱ्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत असून, या धोरणाचा लाभ घेत सुमारे ७८ हजार शेतकऱ्यांनी ६४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा केला आहे. धोरणानुसार जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च होणार आहे.

महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भातील महावितरणच्याअकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सर्व पाचही परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धोरणाच्या व्यापक प्रसारासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यासह अभियंते, जनमित्र आणि सर्व तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क, ग्राहक मेळावे, विविध प्रसिद्धिमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे या धोरणाला यश मिळत आहे. यासाठी महावितरणकडून संपूर्ण विदर्भात ३५८ ग्राहक मेळावे, २०६ ग्रामसभा, १७५ ठिकाणी ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले.

कृषी ऊर्जा धोरणाचा २३ मार्च २०२१च्या अखेरीस विदर्भातील ७७ हजार ५६६ कृषी पंपधारक ग्राहकांनी लाभ घेतला असून या ग्राहकांनी थकीत वीज बिल आणि चालू महिन्याचे वीज बिल अशा दोन्ही बिलांपोटी सुमारे ६४ कोटी ३० लाख रुपयांचा भरणा केला आहे. या धोरणांनुसार शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन गावच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. या धोरणांनुसार शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन गावच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

असा आहे परिमंडळनिहाय तपशील

परिमंडळ शेतकरी केलेला भरणा

अकोला १३,०६२ ८.६७ कोटी

अमरावती ९,६४० १०.१८ कोटी

नागपूर २१,४१२ १८.९५ कोटी

चंद्रपूर २१,६६० १५.४१ कोटी

गोंदिया १२,७९२ ११.१० कोटी

Web Title: 78,000 farmers in Vidarbha paid Rs 64 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.