शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन : शरीराच्या शक्तीद्वारे विद्युत उज्रेची बचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:31 IST

सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उज्रेमध्ये रू पांतर करताना मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च होतो. तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणी निर्माण होतात; परंतु एकही पैसा खर्च न करता हिवरखेड रू पराव (तालुका तेल्हारा) येथील चिमुकल्यांनी स्नायू शक्तीचा उपयोग करू न विद्युत उज्रेची बचत करू  शकतो, हे विज्ञान प्रयोगातून सिद्ध करू न दाखविले आहे. केवळ विद्युत उज्रेची बचतच नव्हे, तर शेतीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपयोगी ठरणारे, असे यंत्र या मुलांनी बनविले आहे.

ठळक मुद्देशेती आणि सुदृढ शरीरासाठी उपयोगी असणारा विज्ञान प्रयोगप्रदर्शनातील १२0 मॉडेलमधून आज होणार निवड

नीलिमा शिंगणो-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उज्रेमध्ये रू पांतर करताना मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च होतो. तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणी निर्माण होतात; परंतु एकही पैसा खर्च न करता हिवरखेड रू पराव (तालुका तेल्हारा) येथील चिमुकल्यांनी स्नायू शक्तीचा उपयोग करू न विद्युत उज्रेची बचत करू  शकतो, हे विज्ञान प्रयोगातून सिद्ध करू न दाखविले आहे. केवळ विद्युत उज्रेची बचतच नव्हे, तर शेतीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपयोगी ठरणारे, असे यंत्र या मुलांनी बनविले आहे.४३ वे अकोला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथे सुरू  आहे. या प्रदर्शनात ‘शरीराच्या शक्तीद्वारे उज्रेची बचत करणे’ हा विज्ञान प्रयोगाचा प्रकल्प हिवरखेड रू परावच्या मुलांनी ठेवलेला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक शाळेचे विद्यार्थी शेख जमीर शेख अहमद आणि मो.अदनान फहीमोद्दीन यांनी हा विज्ञान प्रयोग शिक्षक मो.जमीलउर रेहमान शरीफोद्दीन यांच्या मार्गदर्शनात तयार केला. भंगारात पडलेली सायकल, पाण्याची मोटर, पाइप, पट्टा, पाण्याच्या टाक्या, स्प्रे नोझल, फॅनचे पाते आणि ग्रेंडरचा उपयोग चिमुकल्यांनी केला आहे. या प्रयोगामुळे स्नायुशक्तीचा उपयोग करू न विद्युत उज्रेची बचत करता येते. स्नायूंची हालचाल होत असल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शरीर सुडौल होण्यासही या प्रयोगामुळे मदत होत असल्याचे शेख जमीरने सांगितले.या प्रयोगात सायकलच्या चाकाद्वारे पट्टा फिरते. पट्टा फिरल्याने हवेचा दाब निर्माण होते. दाब निर्माण झाल्यामुळे विहिरीचे पाणी पाइपद्वारे छताच्या टाकीमध्ये जमा करता येते. तसेच शेतीतील पिकांना कीटकनाशक फवारणी करता येते, फॅनचे पाते फिरल्याने धान्याची उफणी केली जाते, ग्रेंडर फिरल्यामुळे याद्वारे चाकू, सुरी वा अन्य अवजारांना धार लावता येते. याशिवाय सायकलच्या चाकाद्वारे डीसी मोटर फिरते. त्या फिरल्यामुळे विद्युत उज्रेची निर्मिती होते. त्यामुळे आपल्याला लाइट किंवा मोबाइल बॅटरी चार्ज करता येते, असे हे बहुपयोगी मॉडेल प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दररोज फुकट वाया जाणारी स्नायूंची शक्ती आपल्याला कशी उपयोगी होऊ शकते, हे तर या मुलांनी या प्रयोगातून सांगितलेच आहे; त्याहीपेक्षा पाण्यासाठी उज्रेची आणि उज्रेसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून, दोन्ही गोष्टी अतिशय र्मयादित असल्याने ऊर्जा व पाणी बचत करण्याचे आवाहन या चिमुकल्यांनी केले आहे.

आज समारोपअकोला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम सोमवार, ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता भिकमचंद खंडेलवाल विद्यालय प्रांगणात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. रामामूर्ती राहतील. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग चंदनसिंह राठोड, प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान तथा गणित संस्था नागपूर संचालक प्राचार्य डॉ. पी.व्ही. जाधव उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनातील १२0 मॉडेलमधून आज होणार निवडराज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथे आयोजित ४३ वे अकोला जिल्हास्तरीय विज्ञान  प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी पालक व विद्यार्थ्यांनी व्यापक प्रतिसाद दिला. प्रदर्शनात मांडलेल्या १२0 मॉडेलचे परीक्षण करू न, त्यापैकी ११ मॉडेलची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता केली जाणार आहे. विजेत्यांना सोमवार, ११ डिसेंबर रोजी होणार्‍या समारोप कार्यक्रमात बक्षीस देण्यात येणार आहे.शनिवारी, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोडे, विज्ञान पर्यवेक्षक अरू ण शेगोकार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ. एम.आर. बेलखेडकर, प्रा.डॉ. श्रीकृष्ण सावरकर, प्रा.डॉ.जी.डब्ल्यू. बेलसरे, प्रा.डॉ. हरीश मालपाणी, प्रा.डॉ. श्रीकांत पाध्ये, प्रा.डॉ. पूनम अग्रवाल, प्रा.डॉ. अर्चना सावरकर, उत्तम डहाके, प्रा.डॉ.ए.डी. सिरसाट आदींनी मॉडेलचे परीक्षण व निरीक्षण केले. निवड झालेल्या मॉडेलची घोषणा बक्षीस वितरण समारंभात करण्यात येणार आहे. 

टॅग्स :scienceविज्ञानAkola cityअकोला शहरSchoolशाळा