मलकापूर परिसरातील जुगार अड्ड्यावरून ४ जुगारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:56+5:302021-04-11T04:17:56+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर रोडवर सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या ...

4 gamblers arrested from gambling den in Malkapur area | मलकापूर परिसरातील जुगार अड्ड्यावरून ४ जुगारी अटकेत

मलकापूर परिसरातील जुगार अड्ड्यावरून ४ जुगारी अटकेत

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर रोडवर सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून ४ जणांना अटक करण्यात आली असून आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मलकापूर रोडवर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून सुरेश नामदेव शेळके ५९ वर्षे राहणार मलकापूर, संतोष शिवलिंग उन्हाळे व भाडे ४० वर्ष राहणार मलकापूर, अभिजित गणेश दांदळे वय २३ वर्षे राहणार अंबिका नगर मलकापूर व सनी संजय गायकवाड वय २४ वर्षे राहणार खडकी या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या जुगाऱ्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विशेष पथकाने केली.

Web Title: 4 gamblers arrested from gambling den in Malkapur area