अकोला जिल्ह्यात युरियाचा २२०० टन साठा उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:56 AM2020-07-25T10:56:09+5:302020-07-25T10:56:19+5:30

१ हजार २०० मेट्रिक टन खतसाठा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांना वितरित करण्यात आला आहे.

2200 tons of urea available in Akola district! | अकोला जिल्ह्यात युरियाचा २२०० टन साठा उपलब्ध!

अकोला जिल्ह्यात युरियाचा २२०० टन साठा उपलब्ध!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खरीप पिकांसाठी युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता, जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत आणखी २ हजार २०० मेट्रिक टन युरिया खतसाठा कृषी आयुक्तालयामार्फत उपलब्ध झाला असून,त्यापैकी १ हजार २०० मेट्रिक टन खतसाठा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांना वितरित करण्यात आला आहे.
खरीप हंगामातील पेरण्यानंतर उगवलेल्या कपाशी व इतर खरीप पिकांसाठी युरिया खताची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जिल्ह्यात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता, युरिया खताचा तुटवडा भासणार नाही. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या मागणीनुसार २४ जुलैपर्यंत राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खतसाठा उपलब्ध झाला. उपलब्ध खतसाठ्यापैकी १ हजार २०० मेट्रिक टन युरिया खतसाठा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांना वितरित करण्यात आला असून, उर्वरित १ हजार मेट्रिक टन युरिया खतसाठा दोन दिवसांत जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांना वितरित करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांनी सांगितले.


चार महिन्यांत ११ हजार मेट्रिक टन युरियाची विक्री!
जिल्ह्यात १ एप्रिल ते २४ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत कृषी आयुक्तालयामार्फत उपलब्ध झालेल्या ११ हजार मेट्रिक टन युरिया खतसाठ्याची विक्री करण्यात आली असून, शेतकºयांची वाढती मागणी लक्षात घेता, जिल्ह्यासाठी आणखी २ हजार २०० मेट्रिक टन युरिया खतासाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध खतसाठा कृषी निविष्ठा केंद्रांना वितरीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी मुरली इगळे यांनी दिली.

Web Title: 2200 tons of urea available in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.