शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

२0 कर्मचारी आढळले गैरहजर

By admin | Updated: January 21, 2015 01:17 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कर्मचा-यांना सीईओंनी दिली समज.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सोमवारी सकाळी केलेल्या पाहणीत गैरहजर आढळून आलेल्या व कार्यालयात उशिरा आलेल्या २0 'लेटलतीफ' कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) एम. देवेंदर सिंह यांनी समज देऊन, यापुढे कार्यालयात उशिरा येणे चालणार नसल्याचा इशारा दिला.जिल्हा परिषदेचे नवे सीईओ एम.देवेंदर सिंह यांनी सोमवारी सकाळी १0.३0 वाजता जिल्हा परिषद आवारातील विविध विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन, कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची माहिती घेतली.त्यामध्ये कार्यालयीन कामकाजाची वेळ सुरु झाल्यानंतर २0 कर्मचारी गैरहजर आढळून आले. विविध विभागांच्या कार्यालयात उशिरा आलेल्या या कर्मचार्‍यांना संबंधित विभागप्रमुखांसह 'सीईओ' कक्षात बोलावून, कार्यालयात उशिरा येण्याबाबत 'लेटलतीफ' कर्मचार्‍यांना विचारणा केली तसेच यापुढे कार्यालयीन कामकाजाच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने येणे चालणार नाही, वेळेवर कार्यालयात आले पाहिजे, अशी समज सीईओ एम. देवेंदर सिंह यांनी 'लेटलतीफ' कर्मचार्‍यांना दिली.जिल्हा परिषद कार्यालयीन कामकाज सुरु होण्याच्या वेळेत कार्यालयात यावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी समज संबंधित कर्मचार्‍यांना दिली. विविध विभागांत बायोमॅट्रिक मशीन आणि 'सीसी' कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी स्पष्ट केले.