कपडे घेऊन दिले नाही म्हणून १६ वर्षीय मुलीने पेटवून घेतले!

By Admin | Updated: February 19, 2017 02:33 IST2017-02-19T02:33:57+5:302017-02-19T02:33:57+5:30

मुलगी २0 टक्के जळाली असून, सध्या अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

A 16-year-old girl burnt her not to wear clothes! | कपडे घेऊन दिले नाही म्हणून १६ वर्षीय मुलीने पेटवून घेतले!

कपडे घेऊन दिले नाही म्हणून १६ वर्षीय मुलीने पेटवून घेतले!

अकोला, दि. १८- जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सांझापूर येथे १६ वर्षीय शाळकरी मुलीने आईने शिष्यवृत्तीच्या पैशातून कपडे घेऊ नको म्हटल्याच्या कारणावरून १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पेटवून घेतल्याची घटना घडली. ही मुलगी २0 टक्के जळाली असून, सध्या अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सारिका नारायण डांगे (१६) असे मुलीचे नाव आहे. ही मुलगी ११ व्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील शेतमजूर असून, ते मजुरी करून कसेबसे कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. सारिकाला शालेय शिष्यवृत्तीचे ६00 रुपये मिळाले होते. त्यातून स्वत:करिता कपडे घेण्याची तिची तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्यासाठी तिने आईकडे हट्ट धरला. परंतु, घरची परिस्थिती पाहता तिने कपडे घेण्यासाठी सध्या काही दिवस थांबावे, असे आईने सांगितले असता या क्षुल्लक कारणावरून तिने रागात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची गावात चर्चा आहे.
या घटनेनंतर जळालेल्या अवस्थेत सारिकाला अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तेथून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: A 16-year-old girl burnt her not to wear clothes!