शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

११६६ घरकुलांना १७ कोटी मंजूर

By admin | Updated: June 7, 2014 23:54 IST

आकोट : पालिकेद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत ११६६ घरकुलांना शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, यासाठी तब्बल १६ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने रमाई आवास लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आकोट : पालिकेद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत ११६६ घरकुलांना शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, यासाठी तब्बल १६ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने रमाई आवास लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेंतर्गत आकोट पालिकेने सन २०११-१२ मध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यानंतर शासनाच्या आदेशावरून सन २०१२-१३ साठी नवीन उद्दिष्ट पाठविण्यात आले. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ५९० आणि दारिद्र्यरेषेवरील ५०६ लाभार्थींचा समावेश होता. परंतु या उद्दिष्टासाठी निधीच नसल्याने हे सारे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून होते. बराच कालावधी होत असल्याने याबाबत लाथार्थींची मोठ्या प्रमाणात ओरड होती; परंतु प्रत्येकवेळी निधी अनुपलब्धतेचे कारण पुढे केले जात होते. अशा स्थितीत माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांना हा प्रश्न निकाली काढण्याची गळ घातली. त्यासाठी नामदार मोघे यांनी आकोट पालिकेशी बैठक आयोजित केली. या बैठकीला माजी राज्यमंत्री गणगणे, नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, मुख्याधिकारी समीर लाठी, संजय अढाऊ, लिपिक किशोर एडणे हे उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये आकोट पालिकेद्वारे राबविलेल्या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विशेष बाब म्हणून आकोट पालिकेच्या ११६६ प्रस्तावांना मंजुरात देण्यात आली. या घरकुलांसाठी लागणारा १६ कोटी ८५ लाख ६४ हजारांचा निधी येत्या जूनमध्ये पालिकेस देण्यात येणार आहे. या मंजुरातीमुळे रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
.......