शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

गोळीबारात तरुण जागीच ठार; जागेच्या वादातून श्रीरामपूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 PM

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटेवस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

श्रीरामपूर : तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटेवस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.      मयताचे नाव गणेश साळवे (वय २८, रा. जोशी वस्ती, निपाणी वडगाव) असे आहे. त्याच्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. दहा ते बारा जणांनी तलवारीने हल्ला केला. गावठी कट्ट्यातून गणेश याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी घुसल्याने जागेवर मृत्यू झाला. श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. गोळी लागून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र जगधने यांनी सांगितले.  घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करीत होते. रुग्णालयामध्ये मयताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपींची धरपकड सुरू केली. त्यात सहा आरोपींना पकडण्यात यश आले. आरोपींमध्ये राजेंद्र बाबासाहेब गांगुर्डे, धोंडीराम तुकाराम इंगळे, गजानन सखाराम गांगुर्डे, सारिका राजेंद्र गांगुर्डे, पार्वतीबाई बाबासाहेब गांगुर्डे, सुखदेव भानुदास इंगळे (रा. लाटेवस्ती) यांचा समावेश आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारीfireआगDeathमृत्यू